BIG NEWS : धक्कादायक..! चक्क कोरोनाने उतरवले अंगावरील दागिने..! वाचा ते कसे….

आनंद खर्डेकर 
Saturday, 18 July 2020

घरात सासूने सुनेला दागिने काढून ठेव म्हटले किंवा शिक्षकाने वर्गातील वा महाविद्यालयातील विद्यार्थ्याला कडं, ब्रासलेट काढून ठेव म्हटले तर तिथे इगोचा प्रश्न निर्माण होतो. मात्र आता सोने चांदीचे ब्रासलेट गळ्यात, हातात घालून आपली हौस पूर्ण करणाऱ्या प्रत्येक शौकीनाच्या अंगावरील दागिने चक्क कोरोनाने काढून घेतले आहेत. 

परंडा (उस्मानाबाद) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीक काळजी घेऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेकांनी हातातील घडयाळ, अंगठया, ब्रासलेट काढून ठेवले आहेत. त्यामूळे कोरोनाने उतरवले अंगावरील दागीने..! असे चित्र दिसू लागले आहे. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

जीवघेण्या कोरोना महामारीने काळजाचा ठोका चुकविला आहे. कोरोना काळात संसर्ग होणार नाही याची काळजी प्रत्येक जण घेवू लागला आहे. सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर याबाबत नागरिकांमध्ये जागृकता निर्माण झाली आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

समाजमाध्यमातून मिळणाऱ्या सुचनाची चोख अंमलबजावणी केली जात आहे. याबरोबर कोरोना बचावासाठी सांगितलेला काढा घरोघर तयार होऊ लागला आहे. घरोघरी काढा अन प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या रेसीपी सुरू झाल्या आहे. संसर्ग होऊ नये यासाठी बाहेर दुकानात दवाखान्यात गेल्यानंतर कोणत्याही वस्तूला हात लागला जाणार नाही. याची काळजी प्रत्येक जण घेत आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

याबरोबरच दुसऱ्याचा मोबाईल, चावी, चष्मा घडयाळ एकमेकांना देण्याचे टाळले जात आहे. गप्पा मारताना टाळी देखील दिली जात नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्याचा पेन वापरणे जेवणाचा डबा, एकाच बाटलीतील पाणी देखील काळजी म्हणून वापरले जात नाही. या कोरोनाने सोने चांदी दागीण्याचे शौकीनांना चांगलीच धास्ती निर्माण केली आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

अनेकांना सोन्याची गळ्यात साखळी, सोन्याच्या अंगठ्या ब्रासलेट, महागडे घडयाळ वापरण्याची हौस असते. मात्र सतत साबनाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर केल्याने दागिण्याच्या दर्जावर परिणाम होईल. अशी भिती देखील अनेकांना वाटत आहे. सोन्याच्या दागीण्याचा दर्जा व संसर्गापासुन बचावासाठी कोरोनाकाळात अनेकांनी सोन्याचे दागीने काढून ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनाने अनेकांच्या अंगावरील दागीने मात्र या निमित्ताने उतरविले आहेत. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

हातात कमीत कमी दागीने असावे 
अनेक ठिकाणी वस्तुला स्पर्श होऊ शकतो. तेथील विषाणू दागीने घडयाळावर येऊ शकतात. साबनाने, सॅनिटयझरने हात धुताना दागीने धुतले जातील असे नाही. त्यामुळे कमीत कमीत दागीने वापरावेत. कोरोनाकाळात साधी राहणी अंगी कारावी 
डॉ. आनंद मोरे, परंडा

( संपादन : प्रताप अवचार ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Corona Effect remove jewelry on body