महत्त्वाची बातमी : उस्मानाबादेतील कोरोना चाचणी प्रयोगशाळेचा मार्ग मोकळा..!

सयाजी शेळके
Tuesday, 21 July 2020

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या येथील उपपरिसरामध्ये नव्याने सुरु होत असलेल्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेस अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयितांची तपासणी या प्रयोगशाळेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उस्मानाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या येथील उपपरिसरामध्ये नव्याने सुरु होत असलेल्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेस अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयितांची तपासणी या प्रयोगशाळेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या येथील  उपपरिसरात असलेल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात एक अनोखी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या निधी न घेता विविध सामाजिक संस्था, दानशूर नागरिक यांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक संस्थांचे योगदान आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यातील संशयितांच्या स्वबची तपासणी करण्यासाठी कधी लातूर तर कधी आंबेजोगाई येथे नमुने पाठवले जात होते.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

मात्र या दोन्ही ठिकाणी तेथील जिल्ह्यांचा चाचणी करण्याचा ओघ वाढत असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक स्वॅब नमुने प्रलंबित राहत होते. गेल्या अनेक दिवसापासून हीच परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाट्याला आली होती. आता मात्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने येथील नव्याने उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेत मान्यता दिली आहे. त्यामुळे येथे स्वॅब घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आठ तासांमध्ये किमान दोनशे नमुने या प्रयोगशाळेत तपासता येणार आहेत. या प्रयोगशाळेची नमुना तपासण्याची कार्यक्षमता वाढविता येऊ शकते. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

दिल्ली येथील आयसीएमआरए या संस्थेकडून स्वॅब नमुने तपासण्यास पूर्णतः परवानगी मिळाली आहे. हे नमुने तपासत असताना याच दिल्ली येथील संस्थेकडून लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. सर्व स्वॅब अहवाल तिथे जातात. बुधवारी दिवसभरात लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे गुरुवारपासून जिल्ह्यात स्वॅब नमुने तपासणीला सुरुवात होऊ शकते. 
- प्रशांत दीक्षित, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, उस्मानाबाद. 

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Recognition of Corona Testing Laborator at Osmanabad