मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 819 कोटींची मदत

राजेभाऊ मोगल
Wednesday, 20 November 2019

 • परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी दिलासा 
 • पंचनामे करून आपला अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयात
 • मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर तातडीने जमा करण्याचे निर्देश

औरंगाबाद - हाती आलेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे नासाडी झाली. या नुकसानीपोटी भरपाई म्हणून पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील बाधित  शेतकऱ्यांसाठी 819 कोटींची मदत शासनाकडून मिळाली आहे. आगामी आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ही मदत जमा होईल. रब्बी हंगामाच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. 

यंदा पावसाने सुरवातीला दगा दिला. त्यानंतर या परतीच्या पावसामुळे विभागातील खरिपाची पिके पूर्णत: उद्‌ध्वस्त झाली. या नुकसानीचे जिल्हानिहाय प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आपला अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविले होते. यानंतर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील पीक नुकसानीचा एकत्रित अहवाल तयार करून शासनाकडे पाठविला होता. 

हेही वाचा... धक्कादायक! आर्थिक मंदीमुळे उद्योजकाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

हेही वाचा - बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड

Image result for सकाळ अतिवृष्टीने नुकसान मराठवाडा sakal

बाधित शेतकऱ्यांची संख्या 45 लाखांवर

विभागातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 45 लाखांवर होती. नुकसानीच्या क्षेत्राचा विचार करता तेसुद्धा 50 लाख हेक्‍टरपर्यंत असल्याने भरपाईपोटी शेतकऱ्यांना 3,351 कोटींचा मदत द्यावी, असे त्या अहवालात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर राज्यपाल्यांनी फळबागांसाठी प्रतिहेक्‍टर 18, तर इतर पिकांसाठी 8 हजारांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी 819 कोटी 63 लाख 8 हजारांची निधी मिळाला आहे. संबंधित मदत बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर तातडीने जमा करण्याचे निर्देश शासनाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

हेही वाचा -  येमेनची कन्या झाली औरंगाबादची सून..

औरंगाबादमध्ये हे काय घडले : रात्री गेली बर्थडे पार्टीला, मित्राने पाजले गुंगीचे औषध, मग...

विभागास मिळालेली जिल्हानिहाय मदत 

 • ​औरंगाबाद 12181.09 
 • जालना 11021.99 
 • बीड 14418.83 
 • लातूर 10069.02 
 • नांदेड 12314.23 
 • उस्मानाबाद 7819.58 
 • परभणी 8762.73 
 • हिंगोली 5376.61 
 • एकूण 81963.08 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 819 crore aid to farmers