धक्कादायक! आर्थिक मंदीमुळे उद्योजकाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

  • वाळूजमधील घटना 
  • उत्पादनात घट झाल्याने होते निराश 
  • राहत्या घरी घेतला गळफास

वाळूज (जि. औरंगाबाद) - आर्थिक मंदीमुळे उत्पादनात घट होऊन आर्थिक अडचणीत सापडल्याने जीएसटी थकला. या कारणावरून एका 53 वर्षीय उद्योजकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.19) सिडको वाळूज महानगर येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. विष्णू रामभाऊ काळवणे (रा. साक्षीनगरी, सिडको
वाळूज महानगर) असे आत्महत्या करणाऱ्या उद्योजकाचे नाव आहे. 

विष्णू काळवणे यांचे वाळूज औद्योगिक वसाहतीतील डब्ल्यू-52 मध्ये बफिंग शॉप आहे. मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने घाटीत दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासून 10.50 वाजता त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात
आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
चिठ्ठी आढळली 
पोलिसांना तपासादरम्यान मृत विष्णू काळवणे यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत मंदीमुळे जीएसटी थकल्याने तो भरण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यांनी संबंधितांना वेळ वाढवून मागितला; मात्र तो मिळाला नाही, असे या चिठ्ठीत नमूद केलेले आहे. 
 

हेही वाचा -  येमेनची कन्या झाली औरंगाबादची सून..

औरंगाबादमध्ये हे काय घडले : रात्री गेली बर्थडे पार्टीला, मित्राने पाजले गुंगीचे औषध, मग...

औरंगाबादेत रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या  
औरंगाबाद :
रेल्वेच्या धडकेत काकासाहेब रायभान आधाने (वय 29, मूळ रा. विरमगाव, ता. खुलताबाद, ह.मु. जाधववाडी) ठार झाले. ही घटना मंगळवारी (ता. 19) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. 

आधाने एका कंपनीत कामाला होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली होती. त्यांची पत्नी दिवाळीनिमित्त माहेरी गेली होती. सोमवारी रात्री ते दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास आधाने यांचा मृतदेह गोलवाडी रेल्वेरुळावर आढळला. त्यांची दुचाकीही रेल्वेरुळाजवळच उभी होती.

हेही वाचा - बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड

या घटनेबाबत माहिती समजताच छावणी पोलिसांनी धाव घेतली. त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून पोलिसांनी आधाने यांची ओळख पटवत नातेवाइकांना कळविले. त्यांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

हे वाचले का? : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessman Suicide At Waluj Aurangabad