Hingoli Corona Update : हिंगोलीत कोरोना रुग्णसंख्या २०० पार

हिंगोली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आलेख हा चिंतेचा ठरत आहे.
hingoli corona update
hingoli corona update Sakal

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आलेख हा चिंतेचा ठरत आहे. रविवारी (ता.१६) नव्याने ७४ कोरोना रूग्ण आढळल्याने सद्यःस्थितीत एकूण रुग्णसंख्या २१६ झाली आहे. सक्रिय रूग्णसंख्येने द्विशतक पार केले आहे. १६ जानेवारी रोजी प्राप्त अहवालात नव्याने ७४ रुग्ण वाढले. ज्यामध्ये जिल्ह्यात १६० जणांच्या रॅपिड अँन्टीजेन चाचणीत (Rapid Antigen Test) सेनगाव परिसरात दोन रूग्ण आढळले. जिल्ह्यात ६६२ जणांची आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली (Hingoli) परिसरात ६५ जणांच्या तपासणीत २२ रुग्ण आढळते आहेत. यात हिंगणी तीन, एसआरपीएफ एक, सिरसम एक, नर्सी एक, खुशाल नगर एक, हिलटाॅप काॅलनी दोन, नवा मोंढा पाच, गाडीपुरा एक, अंतुलेनगर एक, सामान्य रुग्णालय एक, बेघर निवारा केंद्र एक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था एक, एनटीसी एक, सरस्वतीनगर एक असे रुग्ण आढळते आहेत. (Above 200 Covid 19 Cases Reported In Hingoli g)

hingoli corona update
PM मोदींच्या घोषणेने नेपाळचा संताप, काम बंद करण्यास सांगितले

वसमत परिसरात ३६७ जणांच्या तपासणीत गुंडा दोन, कंरजी दोन, पांगरा शिंदे दोन, वाई एक, आंबा एक, चोंढी एक, हट्टा एक, कोर्टा एक, कुरुंदा १६, भेंडेगाव एक, हयातनगर एक, वसमत शहर सहा, शिवपुरी एक, थोरवा एक असे ३७ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात ३३ जणांच्या तपासणीत डोंगरगाव एक, खापरखेडा एक, विकासनगर दोन, भिमनगर एक, ग्रीन पार्क एक असे सहा रुग्ण आढळले. औंढा नागनाथ परिसरात १७७ जणांच्या तपासणीत औंढा येथे सहा रुग्ण आढळले. तर सेनगाव येथे २० जणांच्या तपासणीत पुसेगाव येथे एक रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात ६६२ जणांच्या तपासणीत ७४ रुग्ण आढळले आहेत.

hingoli corona update
गप्प बसणारे भाजप नेते चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात - रोहित पवार

यापैकी हिंगोली सामान्य रुग्णालयातील तीन रुग्ण व वसमत येथील तीन, तर सेनगाव येथील एक असे सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६ हजार ३४३ रूग्ण आढळले. त्यापैकी १५ हजार ७३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यःस्थितीत २१६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.आतापर्यंत कोरोनामुळे (Corona) ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com