
नेकनूर येथे १४ नोव्हेंबर रोजी विवाहितेला जिवंत जाळल्याची घटना घटना समोर आली होती. सावित्री अंकुरवार असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून अविनाश राजूरे याने खून केला हेाता.
बीड : प्रेयसीच्या अंगावर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळून खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सोमवारी (ता. २३) आणखी सहा दिवसांची वाढ केली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
नेकनूर येथे १४ नोव्हेंबर रोजी विवाहितेला जिवंत जाळल्याची घटना घटना समोर आली होती. सावित्री अंकुरवार असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून अविनाश राजूरे याने खून केला हेाता. नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील विवाहित असलेली सावित्री अंकुमवार व अविनाश राजूरे हे दोघे दोन वर्षांपासून पुण्यात एकत्र राहत होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
१३ नोव्हेंबर रोजी अविनाश व सावित्री हे दोघे पुण्याहून दुचाकीवर शेळगावकडे निघाले होते. १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ते बीड जिल्ह्यातील येळंबघाट जवळ एका मंगल कार्यालयासमोरच मुक्कामी थांबले. १४ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अविनाशने सावित्रीच्या अंगावर अॅसिड टाकले व पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी शेळगावातून अविनाशला अटक केली होती. त्याला न्यायालयाने २३ नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने सहा दिवसांची वाढ केल्याची माहिती उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी दिली.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)