esakal | जालन्याच्या  'स्‍वॅब मॅन' ला साडेतीन महिन्यांनतर मिळणार विश्रांती
sakal

बोलून बातमी शोधा

swab man.png

संशयित रूग्णांचे स्‍वॅब नमुने तपासणीसाठी पुणे व औरंगाबाद प्रयोगशाळेत घेऊन जाता जाता हजारो किलोमिटरचा प्रवास करणारे जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्‍त्रक्रियागार दिपक भाले लॉकडाउमधले हिरो ठरले आहे. जालन्यात लवकरच कोरोनाची चाचणीस सुरूवात होणार असल्याने तब्बल साडेतीन महिन्यानंतर त्यांना विश्रांती मिळणार आहे.

जालन्याच्या  'स्‍वॅब मॅन' ला साडेतीन महिन्यांनतर मिळणार विश्रांती

sakal_logo
By
महेश गायकवाड

जालना : देशासह राज्यावर आलेला कोरोनाच्या विषाणूच्या संकटात आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धे बनवून या महामारीचा मुकाबला करत आहेत. संशयित रूग्णांचे स्‍वॅब नमुने तपासणीसाठी पुणे व औरंगाबाद प्रयोगशाळेत घेऊन जाता जाता हजारो किलोमिटरचा प्रवास करणारे जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्‍त्रक्रियागार दिपक भाले लॉकडाउमधले हिरो ठरले आहे. जालन्यात लवकरच कोरोनाची चाचणीस सुरूवात होणार असल्याने तब्बल साडेतीन महिन्यानंतर त्यांना विश्रांती मिळणार आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

देशासह राज्यावर आलेल्या कोरोना विषाणूचे संकट रोखण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल आदी यंत्रणा युद्धपातळीवर कष्ट घेत आहे. या संकटाचा सामना करणाऱ्या कोरोना योद्धांना आपल्या घर कुटुंबापासून वेगळं रहाव लागत आहे. या योध्यांमध्ये असाच एक हिरो ठरले आहेत  जालन्याचे स्‍वॅब मॅन दीपक भाले.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

सात -आठ वर्षापूर्वी आलेल्या स्‍वाईन फ्ल्यूची साथीत श्री. भाले यांच्यावर रूग्णांच्या नमुने तपासणीसाठी नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ती यशस्‍वी पाडल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मुधकर राठोड यांनी त्यांच्यावर विश्‍वास दाखवून कोरोनाचे स्‍वॅब नमुने घेऊन जाण्याची जबाबदारी दिली. देशावर आलेल्या या संकटात आपल्यालाही योगदान देण्याची संधी मिळाल्याने श्री भाले यांनी मनापासून आपले कर्तव्य निभावण्यास सुरूवात केली. त्यांची दोन्ही मुले तापाने फणफणत असताना ते कोरोना कर्तव्यावर होते. हे विशेष.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात श्री भाले  यांनी बसने प्रवास करत पुण्यातील प्रयोगशाळेत स्‍वॅब नमुने पाठवले. बससेवा बंद झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना खासगी वाहन उपलब्ध करून दिले. त्याद्वारे स्‍वॅब नमुने घेऊन वीस दिवस रोज पुणे ते जालना असा सातशे किलोमीटर तर एप्रिलमध्ये औरंगाबदमध्ये प्रयोगशाळा सुरू झाल्यांनतर साडेतीन महिन्याच्या काळातला जालना ते औरंगाबाद असा चौदा हजार मिळून तीस हजारापेक्षा अधिक प्रवास त्यांना करावा लागला. आरोग्य मंत्र्याच्या प्रयत्नातून आता जालन्यातच लवकरच कोरोना चाचणीला सुरूवात होणार असल्याने दीपक भालेंना विश्रांती मिळणार आहे.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

 जिल्ह्याचे पालकमंत्री  राजेश टोपे यांच्या पुढाकाराने  कोरोना चाचणीसाठी जिल्ह्याला मंजूर झालेली आरटीपीसीआर  (रिअल टाइम पॉलीमरेज चेन रिएक्शन) लॅबचे काम युद्धपातळीवरचे कष्ट घेऊन जवळपास पूर्ण झाले आहे. अत्याधुनिक  तंत्रज्ञानयुक्त असलेल्या या प्रयोगशाळत चोवीस तासात एक हजार चाचणी करण्याची क्षमता आहे. लॅबसाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळही उपलब्ध झाले आहे. येत्या दोन दिवसात ही लॅब सुरू होणार असल्याची माहिती आरेग्य विभागातील सुत्रांनी दिली आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक

 कोरोना विषाणूच्या संकटात माझ्या हातून चांगल काम व्हाव. अशी माझी मनापासून इच्‍छा होती. त्यामुळे आत्मविश्‍वासने कठीण परिस्थितीत मी हे काम करत आलो. या कामात मला कुटुंबाची आणि रूग्णालयातील सर्व सहकाऱ्यांची साथ मिळाली. या कामात निगेटिव्ह अहवालाने समाधान दिले तर पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर दिवसभर मन बेचैनही व्हायचे.  हे संकट संपेपर्यंत माझ काम सुरू राहणार आहे. जनेतसाठी सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी कर्तव्यावर आहे. त्यामुळे जनतेने शासनाच्या नियमाचे पालन करून या लढ्यात सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.
दीपक भाले,  स्‍वॅब मॅन