'ते' रुग्णालयात आले अन् सुरु केली व्हेंटिलेटरची पूजा ! 

bjp kanabh puja.jpg
bjp kanabh puja.jpg

कळंब (उस्मानाबाद) : कोरोनाबाधितांवर सक्षम उपचार करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी आरोग्य प्रशासन रात्रंदिवस झटत आहे. कळंब तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असून शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेले व्हेंटिलेटर फिजिशन तज्ञ नसल्याने धूळखात पडून आहेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या तालुका शाखेच्या वतीने बंद व्हेंटिलेटरची मंगळवारी (ता.१५) पूजा करून व्हेंटिलेटर त्वरित सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनांग्रस्त गंभीर रुग्णाला वेळेत व्हेंटिलेटर न मिळू शकल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कळंब तालुक्यात आजघडीला ३२८ ऍक्टिव्ह रुग्ण असून दररोज रुग्णाचा आकडा वाढतच चालला आहे. यातच व्हेंटिलेटर असूनही त्याचा वापर केवळ फिजिशन तज्ञ उपलब्ध नसल्याने बंद आहे. त्यामुळे केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गंभीर रुग्णाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. मागच्या पंधरा दिवसापूर्वी शासनाकडून खासदार ओमप्रकाश राजेंनीबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या प्रयत्नातून पाच व्हेंटिलेटर उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत.

वापराविना धूळखात पडून असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या तालुका शाखेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन धूळखात पडलेल्या व्हेंटिलेटरची पुजा करून प्रयत्न करण्यात आला.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, बाजार समितीचे अध्यक्ष रामहरी शिंदे, साहेबराव बोंदर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिलीप पाटील, संजय जाधवर, माणिक बोंदर, शिवाजी गिड्डे, हरिभाऊ शिंदे, सतपाल बनसोडे, अरुण चौधरी, संतोष कसपटे, आबा रणदिवे, संदीप बविकार, प्रशांत लोमटे, इम्रान मुल्ला, गणेश त्रिवेदी, अशोक क्षीरसागर, बंटी चोंदे उपस्थित होते.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com