
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांची माहिती
लातूर : लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 17 आक्टोबरपासून लातूर व मुरुड येथे शेतमाल तारण योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी दिली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
राज्यात अग्रेसर असलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतमालास बाजार भावाचा आर्थिक फटका बसू नये यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सूचनेनुसार सोयाबीन या शेतमालासाठी तारण योजनेला ता. १७ आक्टोबरला लातूर व मुरूड उपबाजार पेठ या ठिकाणी सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती श्री. शहा यांनी दिली.
सध्या रब्बी हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये यासाठी बाजार समिती शेतमाल तारण योजना राबवत आहे. कर्ज वाटप हे सहा टक्के दराने दिले जात असून, तारण कर्ज बाजार भावाच्या ७५ टक्के रक्कमेवर सहा महिन्यासाठी देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार पेठेत जास्तीत-जास्त भाव आल्यास विक्री करता येणार आहे. यात शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सहभागी होताना ही कागदपत्रे आणावी
शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत येताना बँक पासबुक, आधार कार्ड, चालू वर्षाचा सातबारा, पीकपेरा आणणे आवश्यक आहे. जास्ती जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शहा, उपसभापती मनोज पाटील, प्रभारी सचिव सतीश भोसले यांनी केले आहे.
(संपादन-प्रताप अवचार)