esakal | राजकीय नेते श्रोत्यांमध्ये, सरकारी अधिकारी मंचावर : अखेर मुख्यमंत्री आलेच नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

साहित्य संमेलनाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आयोजक संस्थेच्या वतीने देण्यात आले होते. पण, बहुतांश नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली.

राजकीय नेते श्रोत्यांमध्ये, सरकारी अधिकारी मंचावर : अखेर मुख्यमंत्री आलेच नाहीत

sakal_logo
By
सुशांत सांगवे

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांऐवजी प्रथमच लेखकांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले. राजकीय नेत्यांनाही मनाचा मोठेपणा दाखवत आणि आपले वलय बाजूला ठेवत श्रोत्यांमध्ये बसून साहित्य संमेलनाचा आस्वाद घेतला. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान दिल्याने लेखकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

साहित्य संमेलनाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आयोजक संस्थेच्या वतीने देण्यात आले होते. पण, बहुतांश नेत्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली.

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री मधुकर चव्हाण, माजी आमदार सिद्राम आलूरे गुरुजी, वैजनाथ शिंदे, उल्हास पवार हे उपस्थित होते. त्यांचा सन्मान स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी श्रोत्यांमध्ये जाऊन केला.

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

यापूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी कराड येथे झालेल्या संमेलनावेळी रसिकांमध्ये बसून त्यावेळच्या अध्यक्षा दुर्गा भागवत यांचे भाषण ऐकले होते. हाच पायंडा पुढे सुरू राहावा म्हणून महामंडळाने राजकीय नेत्यांना श्रोता म्हणून निमंत्रित केले होते. आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे यांनीही संमेलनाला हजेरी लावली होती.

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

उदघाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांना व्यापीठावर स्थान देण्यात आले. हा उत्सव लेखकांचा आहे. लेखकच व्यापीठावर असतील, असे याआधी आयोजकांकडून सांगण्यात आले होते.

Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके