सुशीलकुमार शिंदे यांनी सुनावले : संमेलनाने राजकारण्यांवर बंधने आणू नका

सुशांत सांगवे
रविवार, 12 जानेवारी 2020

रसिकांमध्ये बसून त्यांनी काही परिसंवादातील लेखकांची मते जाणून घेतली. प्रकाशन कट्टयावर जाऊन विविध पुस्तकांचे प्रकाशन केले. पुस्तक प्रदर्शनाची पाहणी करून काही पुस्तकेही घेतली.

संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी नको, अशी बंधने तुम्ही कशासाठी लादता? हे योग्य नाही. अशा प्रकारचे वाद निर्माण करणे हेही योग्य नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. अनेक राजकारणी लोक उत्तम वाचक, साहित्याची जण असलेले, लेखकसुद्धा आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शिंदे यांनी रविवारी भेट दिली. रसिकांमध्ये बसून त्यांनी काही परिसंवादातील लेखकांची मते जाणून घेतली. प्रकाशन कट्टयावर जाऊन विविध पुस्तकांचे प्रकाशन केले. पुस्तक प्रदर्शनाची पाहणी करून काही पुस्तकेही घेतली. प्रकाशक-वाचकांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला.

प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

शिंदे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी एका साहित्य संमेलनावेळी 'मी राजकीय जोडे बाजूला ठेवून संमेलनाला आलो आहे' असं सांगितले होते; पण या विधानाचा आजच्या काळात चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यावरून वितंडवाद घालणे मला पटले नाही. साहित्य हे सर्वांसाठी आहे. सर्व समाजासाठी आहे. मग राजकरण्यांनी येऊ नये, असे सांगत तुम्ही कप्पे कसे काय पाडता? भेदभाव का करता? राजकारणी लोकही इतरांसारखीच माणसे आहेत. त्यांना बाजूला टाकण्याचा प्रकार कोणी करू नये. समाजातील सर्व छोटे-छोटे प्रवाह समुद्राला जाऊन मिळत असतात. याचेच नाव साहित्य आहे.

धर्माच्या नावावरून विरोध अयोग्य

साहित्य संमेलनाचा आणि माझा संबंध फार जुना आहे. नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा मी उद्घाटक होतो. बार्शीतील संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष होतो, असे सांगून शिंदे म्हणाले, संमेलनाध्यक्ष आपल्या भाषणातून काहीतरी नवा विचार देत असतात. तो त्यांच्या चिंतनातून आलेला असतो. त्यांना धर्माच्या नावावरून विरोध करणे योग्य नाही. अण्णा भाऊ साठे यांनाही अशा प्रकाराला सामोरे जावे लागले होते. पण, ते काय उंचीचे होते, हे आपल्याला नंतर कळले. त्यामुळे लेखकांचा अपमान होता कामा नये. सीमा भागाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. कुठल्याही राज्यात कुठल्याही भाषेला विरोध करणे अयोग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

'कलाग्राम'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News Sushilkumar Shinde