उमरगा शहरात सतर्कतेमुळे टळला नियोजित बालविवाह

0Child_marriage_e1575885664921
0Child_marriage_e1575885664921

उमरगा (जि.उस्मानाबाद) :  शहरातील पोलिस लाईन समोरील बालाजीनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा १५ डिसेंबरला विवाह होणार असल्याची गुप्त माहिती बालविवाह प्रतिबंध समिती उस्मानाबाद आणि जिल्हा महिला व कल्याण विभागाला गुप्त बातमीदारामार्फत समजल्यानंतर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करून बालविवाह रोखला. याबाबतची माहिती अशी की, उमरगा शहरातील पोलिस लाईनच्या विरुद्ध बाजूस असलेल्या बालाजी नगर येथील एका अल्पवयीन मुलीचे १५ डिसेंबरला विवाह करण्याचे नियोजन असल्याची गुप्त माहिती उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीला समजली.

याबाबत अधिक माहिती समितीचे सदस्य सचिन बिद्री यांनी काढली,  इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीचे वय १७ वर्ष असल्याचे समजले. त्यावर समितीचे सदस्य श्री.बिद्री यांनी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद आघाव, नगरपालिका मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांना माहिती दिली. शुक्रवारी (ता.११) समितीचे सदस्य श्री.बिद्री, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी एस. एम. काझी, गफूर औटी, बिट अंमलदार बालाजी कामतकर, जयहरी वाघूलकर, महिला पोलिस शोभा पवार, पालिकेचे अजय सानप, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस आदींनी मुलीच्या घरी जाऊन मुलीच्या पालकांना समुपदेशन करून लेखी स्वरूपात, ज्यामध्ये मुलीचे १८ वर्ष पूर्तीनंतर विवाह करण्याबाबत पालकांकडून व उपस्थित पंचासमक्ष हमीपत्र घेतले.
 

समाजातील अनिष्ट प्रथेमुळे, अविचारी निर्णयामुळे आज कित्येक मुलींना लग्नानंतरच्या जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. अवेळी प्रसूतीमुळे त्यांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. आपल्या मुलीच्या सदृढ आयुष्यमानासाठी, सुखी जीवनासाठी पालकांनी क्षणभर विचार करावा. बालविवाह प्रतिबंध समितीमार्फत जनजागृती बालविवाह रोखण्यासाठी चालू असलेले कार्य कौतुकास्पद आहे.
- बाबा जाफरी, सामाजिक कार्यकर्ते

भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क आणि कर्तव्ये नमूद आहेत. हक्कांची अंमलबजावणी करताना कतृव्य पण पार पाडून एक संघटित, विवेकी समाज घडविण्याची प्रत्येकांनी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. बालविवाह, हुंडाप्रथा सारख्या प्रथेविरोधात प्रत्येकांनी चळवळीत सामील व्हावे.
- मुकुंद अघाव,पोलिस निरीक्षक
 

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com