esakal | दिवाळीत अनुदान देण्याची घोषणा हवेतच; जालना जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल   
sakal

बोलून बातमी शोधा

00help.png

अतिवृष्टीचे नुकसान दिवाळीत न मिळाल्याने शेतकर्‍यांची दिवाळी कडू 

दिवाळीत अनुदान देण्याची घोषणा हवेतच; जालना जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल   

sakal_logo
By
सुभाष बिडे

घनसावंगी (जालना) : मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातात आलेले पिक मातीमोल झाले असले तरी शासनस्तरांवरून मदत देवून शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणार अशी राज्यकर्त्यांची घोषणा हवेत विरली. त्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी कडू झाली. अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे सोयाबीन, मुग यांचे शंभर टक्के तर कपाशीचे सत्तर टक्के नुकसान झाले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मोसंबी फळाचे मोठे नुकसान झाले त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसाने पुन्हा काढणीला आलेल्या सोयाबीन, कापूस वेचणीच्या वेळी कपाशीचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी शासनाने शेतकर्‍यांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास शासनांच्या नियमा नुसार आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी शासनांने सततच्या पावसाने धुक्याने सरसकट नुकसानीचे पंचनामे शासनाकडे पाठविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे किमान दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल ही आशा असतांना शासनाने हे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खिशात देण्याची केलेली घोषणा केवळ घोषणाच राहीली. याउलट सदर शेतकर्‍यांचे अनुदान दोन टप्यात देण्याच्या निर्णयाने शेतकर्‍याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यंदा खरिप हंगामातून शेतकर्‍यांच्या हाती काही पडले नाही त्यातच दिवाळी सणास अनुदान आले असते तर मोठा वार्षिक सण म्हणून एैतिहासीक वारसा असलेल्या दिवाळी सणांचा आनंद व्दिगुणीत झाला. परंतू शासनाकडून अनुदान हे दिवाळी काही दिवसांवर आली त्यावेळी आले. त्यात निधीचे वितरण, गावनिहाय याद्या करणे,  शेतकर्‍यांच्या याद्याची दोन हेक्टरपर्यत छानणी करून याद्या बनविणे, चावडी वाचन करणे, अनुदानांची बील तयार करणे, त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता घेणे , धनादेश तयार करणे, सदर धनादेश बॅकेत देणे, बॅकेत दिल्यानंतर धनादेशाचे पडताळणी होणे अशा अनेक त्रुटी व कायदेशीर प्रकियेने काम करण्यासाठी लागलेला वेळ त्यामुळे सदर अनुदान बॅकेपर्यत येण्यास वेळ लागला. परिणामी दिवाळी सारख्या सणासुदीत शेतकर्‍यांची दिवाळी जेमतेच राहीली. खर्चाच्या वस्तू खरेदीला फाटा देण्यात आला. त्यामुळे राज्यकर्त्याच्या आदेशानुसार दिवाळी सण गोड करण्याएैवजी कडू झाल्याची वेळ आली असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात 

शेतकर्‍यांचा संसार उध्दवस्त झाला आहे यावर्षी निसर्गाने कहर केला त्यातच महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांची थंट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकर्‍यांपर्यत शासनांची मदत पोहचली नाही. शेतकर्‍यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकर्‍यांसाठी ही दिवाळी काळी दिवाळी आहे.-शिवाजी बोबडे, तालुकाध्यक्ष, भाजप, घनसावंगी 

पहिल्या टप्प्यात 40 गावांना अनुदान
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटीचे अनुदान शासनांच्या आदेशानुसार दोन टप्यात देण्यात येणार आहे त्यानुसार आलेल्या अनुदानानुसार 40 गावांचे अनुदानाच्या याद्या व प्रशासकीय काम पूर्ण होवून सदर अनुदान बॅकेकडे पाठविण्यात आले आहे. उर्वरीत गावाचे अनुदान दिवाळीनंतर टाकण्यात येणार आहे. : नरेंद्र देशमुख, तहसीलदार घनसावंगी

(संपादन-प्रताप अवचार)