आंतरभारतीचा 'स्नेहसंवर्धन पुरस्कार' सलीम अली यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

हजारो मैल दूर येऊन एक दिव्यांग व्यक्ती एक प्रकल्प उभा करतो, याचे कोणीही कौतुकच करेल. अशा व्यक्तीला 'स्नेहसंवर्धन पुरस्कार' देऊन सन्मानित करण्याचा निर्णय आंबाजोगाईच्या आंतरभारतीने घेतला आहे. हा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२० रोजी वितरण करण्यात येणार आहे.

अंबाजोगाई (बीड) : आंतरभारतीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार यावर्षी सिमेंटच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या सलीम मारुफ अली यांना जाहीर झाला आहे. आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब, स्थानिक शाखेच्या अध्यक्ष डॉ. अलका वालचाळे, उपाध्यक्ष दत्ता वालेकर, सचिव वैजनाथ शेंगुळे, संयोजक ऍड. कल्याणी विर्धे यांनी अली यांच्या नावाची घोषणा केली.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

 अन्य प्रांतातून येऊन अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या व अंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. डॉ. बाबू खडकभावी यांना पहिला पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर मनीष स्वीट होमचे रुपडा, प्राचार्य डॉ. महावीर शेट्टी, उडपी हॉटेलचे शंकर मेहता, बालाजी केस कर्तनालयाचे आनंद अंकाम व गतवर्षी उडपी रेस्टॉरंटच्या श्रीमती सुशीला शेट्टी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

या वर्षीचे सत्कारमूर्ती सलीम मारुफ अली हे मुळातले उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातले राहणारे आहेत. पंधरा वर्षापूर्वी ते महाराष्ट्रात आले. सात वर्षे मोठ्या भावा सोबत लातूरला काढल्यानंतर ते ७-८ वर्षांपूर्वी अंबाजोगाईला आले. लातूर रोडवर साखर कारखान्याच्या पुढे त्यांनी सिमेंटच्या विविध वस्तू बनवण्याचा प्रकल्प सुरू केला. विशेष म्हणजे पोलीओमुळे लहानपणा पासून ते दोन्ही पायांनी अधू आहेत.

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

हजारो मैल दूर येऊन एक दिव्यांग व्यक्ती एक प्रकल्प उभा करतो, याचे कोणीही कौतुकच करेल. अशा व्यक्तीला 'स्नेहसंवर्धन पुरस्कार' देऊन सन्मानित करण्याचा निर्णय आंबाजोगाईच्या आंतरभारतीने घेतला आहे. हा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२० रोजी वितरण करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Antarbharati Snehwardhan Award announce to Salim Maruf Ali