औरंगाबादेत नगरसेवकावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

तक्रारदार दीड महिन्यापासून हॅथवे एमसीएनचे ऑपरेटर आहेत. पूर्वी ते काम नगरसेवक अय्युब खान करीत होते. हे काम मिळविण्यावरून दोघांत वाद सुरू आहे.

औरंगाबाद : जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक अय्युब खानविरुद्ध 18 डिसेंबरला ऍट्रॉसिटी कायद्यानुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संदीप चांदणे यांच्या तक्रारीनुसार सिटी चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

याबाबत संदीप चांदणे (वय 33, रा. फाजलपुरा, हर्षनगर) यांनी तक्रार दिली. त्यानुसार ते दीड महिन्यापासून हॅथवे एमसीएनचे ऑपरेटर आहेत. पूर्वी ते काम नगरसेवक अय्युब खान करीत होते. हे काम मिळविण्यावरून दोघांत वाद सुरू आहे. 18 डिसेंबरला दुपारी संदीप त्यांच्या पत्नीसह औरंगपुऱ्यातून दुचाकीने जात होते. मंजूरपुरा चौकात असताना तेथे अय्युब खान दुचाकी घेऊन आले.

अरे बाप रे - माजलगावात द बर्निंग ट्रक, अचानक घेतला पेट

वाहतूक जाम झाल्याने संदीप व अय्युब खान समोरासमोर आले. त्यांची नजरानजर होताच अय्युब खान यांनी संदीप चांदणे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. चांदणे यांच्या तक्रारीनुसार सिटी चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलिस आयुक्त एच. एस. भापकर करीत आहेत. 

हूल दिल्यावरून विद्यार्थ्याला मारहाण 

औरंगाबाद : हूल दिल्यावरून विद्यार्थ्याला दोघांनी मारहाण करून गालावर ब्लेडने वार केले. ही घटना 18 डिसेंबरला रात्री सिडको एन-सात भागात घडली. याबाबत प्रशांत विठ्ठलराव खरात (वय 20, रा. सिडको एन-सात) यांनी तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीवरून कट मारण्याच्या कारणावरून अमोल देवकर, भय्या पैठणे (रा. सिडको एन-सात) व आणखी एकाने मारहाण केली. त्यानंतर गालावर ब्लेडने वार केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

सिडको, सुरेवाडीतून दुचाकी लंपास 

औरंगाबाद : शहरातील सिडको एन-नऊ व सुरेवाडी भागातून चोरांनी दोन दुचाकी लंपास केल्या. या घटनांप्रकरणी सिडको व हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहयोगीनगर, जाधववाडी येथील बापूसाहेब हरिचंद्र निकम यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना 19 डिसेंबरला सिडको एन-9 येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळील मैदानात घडली. कायगाव येथील व नोकरीनिमित्त शहरातील सुरेवाडीत राहणाऱ्या रामेश्‍वर बाबूराव निकम यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना 15 डिसेंबरला घडली. 

श्रेयनगरमध्ये घरफोडी

औरंगाबाद : श्रेयनगर, न्यू उस्मानपुरा भागात घरफोडी करून 49 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना 18 डिसेंबरला सायंकाळनंतर घडली. सविता उबाळे यांनी तक्रार दिली. त्या नवीन घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. ही संधी साधून चोरांनी घराचे कुलूप तोडून आतून देवाच्या चांदी व पितळी मूर्ती, मंगळसूत्र, अंगठी, मिक्‍सर आदी दागिने व संसारोपयोगी वस्तू लांबविल्या. चोरीची घटना समजल्यानंतर त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

परस्पर प्लॉट नावावर केला; तिघांवर गुन्हा 

औरंगाबाद : परस्पर प्लॉट नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात 19 डिसेंबरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विष्णू गायकवाड, मधुकर तनपुरे अशी संशयितांची नावे आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. अडाणीपणाचा फायदा घेत फिर्यादी महिला राहत असलेल्या प्लॉटची परस्पर रजिस्ट्री केली. त्यानंतर अर्धा प्लॉट विक्री केली असे फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. 

चायनीज मांजा विक्रेत्यावर कारवाई 

औरंगाबाद : चायनीज मांजा विक्रेत्यांवर सलग दुसऱ्या दिवशी अर्थात 18 डिसेंबरला राजाबाजार व गीर कॉलनी येथे पोलिसांनी कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विजय श्रीकिशन दहिले (रा. राजाबाजार) व आसिफखान महेबूबखान (वय 22, रा. जहांगीर कॉलनी, हर्सूल) अशी कारवाई झालेल्या विक्रेत्यांची नावे आहेत. चायनीज मांजाविक्री प्रकरणी 19 डिसेंबरला सिटी चौक व हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

पडेगावात कार्यालय फोडून चोरी 

औरंगाबाद : पडेगाव येथे कार्यालय फोडून चोराने तीन हजार रुपयांचा टीव्ही व रोख आठ हजार रुपये लंपास केले. ही घटना 15 डिसेंबरला पडेगाव भागात घडली. नदीम मोहम्मद अजतुल्ला रजाउल्ला (रा. पडेगाव) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांचे पडेगाव भागात कार्यालय आहे. चोराने कार्यालयाचे कुलूप तोडून चोरी केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocity Registered Against Corporator in Aurangabad Municipal Corporation