esakal | कृषीपंप सर्वेक्षणात राज्यातले हे परिमंडळ आघाडीवर !
sakal

बोलून बातमी शोधा

krushipump.jpg

पायाभूत सुविधेची गरज शोधण्यासाठी महावितरणचा उपक्रम 

कृषीपंप सर्वेक्षणात राज्यातले हे परिमंडळ आघाडीवर !

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी पायाभूत सुविधेच्या विकासाचे काम महावितरणतर्फे सातत्याने करण्यात येते. शेतकऱ्यांनाही गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधेची नेमकी गरज शोधण्यासाठी महावितरणतर्फे कृषिपंपांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ६२ टक्के सर्वेक्षण पूर्ण करून औरंगाबाद परिमंडळाने या कामात आघाडी घेतली आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिपंप सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. गेल्या साडेचार महिन्यांत ३ लाख ५० हजार २५६ कृषिपंपांपैकी २ लाख १७ हजार ९९८ अर्थात ६२ टक्के कृषिपंपांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित १ लाख ३२ हजार २५८ कृषिपंपांचे सर्वेक्षण या महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्वेक्षणानंतर वितरण रोहित्रे नादुरुस्त होण्याची नेमकी कारणे शोधता येणार आहेत.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

तसेच नवीन वितरण रोहित्रे, नवीन वीजवाहिन्या तसेच नवीन उपकेंद्रे उभारण्याच्या दृष्टीने महावितरणला नियोजन करणे शक्य होणार आहे. पायाभूत सुविधेच्या विकासामुळे शेतकऱ्यांनाही दर्जेदार वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे, असेही मुख्य अभियंता श्री. गणेशकर यांनी सांगितले. 
नवीन वीज जोडण्या तसेच सध्या जोडण्या मिळालेल्या ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी पायाभूत सुविधेचे नियोजन करण्याच्या दृष्टिने राज्यातील सर्व कृषिपंप ग्राहकांच्या सर्वेक्षणाची मोहीम महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांच्या निर्देशानुसार महावितरणने एप्रिलपासून हाती घेतली आहे. 

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 
खुलताबाद, वैजापूर उपविभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव 
परिमंडळातील खुलताबाद उपविभाग व वैजापूर-२ उपविभागाने शंभर टक्के कृषिपंप सर्वेक्षण पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या उपविभागातील अभियंते व जनमित्रांचा स्वातंत्र्यदिनी तत्कालीन सहव्यवस्थाकीय संचालक सुनील चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड  

यावेळी उपअभियंता उस्मान खान, सहायक अभियंता प्रणीत खंडागळे, प्रदीप काळे, सचिन जाधव, अनिल बनसोडे तसेच वैजापूर-२ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय पुंडे, सहायक अभियंता रवींद्र मोरे, योगेश वायकंडे, कनिष्ठ अभियंता मोहंमद अब्दुल हकीम यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. औरंगाबाद परिमंडलातील सर्व उपविभागांनी ६० टक्क्यांहून अधिक कृषिपंप सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. त्याबद्दल सर्व अभियंते व जनमित्रांचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी अभिनंदन केले आहे. 
Edited By Pratap Awachar 

loading image
go to top