esakal | औरंगाबादची विमानसेवा येतेय पुर्वपदावर, ट्रुजेट सुरु करण्याच्या हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

विमान सेवा.jpg

दिवसाकाठी साडेतीनशे प्रवाशी ये-जा ; ट्रुजेट सुरु करण्याच्याही हालचाली

औरंगाबादची विमानसेवा येतेय पुर्वपदावर, ट्रुजेट सुरु करण्याच्या हालचाली

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनामुळे हवाई प्रावासावर मोठा परिणाम झाला होता. काही महिने आपत्कालिन सेवा सोडता, सर्व सेवा बंद होत्या. आता सर्वकाही पुर्वपदावर येत आहे. औरंगाबाद अंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार महिन्यापासून प्रवाशी संख्या वाढू लागली आहे. विमानतळवरून इंडिगो आणि एअर इंडियातर्फे दिल्ली-मुंबई, हैदराबाद या तीन शहारासाठी विमानसेवा सुरु झाली आहे. दर दिवशी साडेतीनशे प्रवाशी रोज ये-जा करीत आहेत. यासह आता हैद्रबाद आणि तिरुतीसाठी कनेक्टीव्हीटी असलेली टुर्जेट विमानसेवा आद्यापही सुरु झालेली नाही. ती सुरु करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रयत्न कण्यात येत आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लॉकडाऊनमुळे मार्च ते एप्रिल दरम्यान विमानतळ बंद होते.आता मात्र विमानतळ खुले झाले असून पुर्वीच्या शहाराला असलेली कनेक्टीव्हीटी पुन्हा सुरु करण्याचे हालचाली करण्यात येत आहे. रविवारपासून(ता.२५) इंडिगोची औरंगाबाद-मुंबई विमानसेवा नियमीत झाली आहेत. यापुर्वी दिल्ली विमानसेवा नियमीत झाली होती.मुंबईसाठीची सेवा नियमीत नव्हती आता तीही नियमीत करण्यात आली आहेत. मे महिन्यापासून ते सप्टेबर पर्यत १९ हजार ५३९ प्रवाशीनी विमान प्रवास केला असल्याची आकडेवारी भारतीय विमानतळ प्रधिकरण विभागाने जाहिर आहे. यामुळे लॉकडाऊन नंतर विमान प्रवास करणाऱ्यांचा आलेख वाढत आहेत. औरंगाबादेतून एअर इंडियाची दिल्ली आणि मुंबई विमानसेवा सुरु आहे. तर इंडिगोतर्फे दिल्ली,मुंबई आणि हैदरबादसाठी सेवा देण्यात येत आहेत. तसेच आता औरंगाबादेतून बंगलोरसाठी विमानसेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आसल्याची माहिती उद्योजक सुनित कोठारी यांनी दिली. विमानसेवा सातत्याने वाढविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न केले. त्यामुळेच इंडिगो सारख्या कंपन्या औरंगाबादेत आल्या आहेत. हेच उद्योजक टुर्जेट आणि नवीन कनेक्टीव्हीटीसाठी आता प्रयत्न करी आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कार्गोही वाढले 
कोरोनामुळे कंपन्याही पुर्ण क्षमतेने सुरु झालेले नाहीत.त्यामुळे देशाअंतर्गत कार्गो सेवा पुर्वी ५ टन जात होते. आता हे सहा पटीने वाढले आहेत. सध्या ३३ टन कार्गोची वाहतूक केली जात आहेत. जसजसे कंपन्यांची उत्पदकात वाढले, कार्गोची क्षमता वाढणार आहेत. असेही सुनित कोठारी यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्या पाच महिन्यात वाढलेले संख्या 
महिना प्रवाशी संख्या 
मे -        १२ 
जून-      ४८९ 
जुलै-     ३४९९ 
ऑगस्ट- ६१७६ 
सप्टेबर-  ९३६३ 


प्रवाशी संख्या झपाट्याने वाढत चालाली आहे. आजपासून इंडिगोचे मुंबईसाठीचे उड्डाण आता नियमीत झाले आहेत. प्रवाशी संख्येचा आलेख वाढत चालाल आहे.आता नव्याने बंगलोर ची सेवा सुरु करण्यासाठी इंडिगोकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. दर-दिवशी साडेतिनशेहुन अधिक प्रवाशी प्रवास करीत आहेत. एप्रिलनंतर अंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार होईल. - सुनित कोठारी, उद्योजक 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image