Corona Breaking : औरंगाबादेत आणखी सात जणांचा कोरोनाने मृत्यू , बळींची संख्या २९६ वर... 

corona death.jpg
corona death.jpg

औरंगाबाद : औरंगाबादेत सकाळीच १३८ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ६४०२ वर गेला आहे. तर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आणखी सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता २९६ वर पोहचली आहे. 

१) नारळी बाग येथील ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ६.४५ वाजता मृत्यू झाला. 

२) शाहीनगर येथील गारखेडा येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. २८ तारखेला उपचारासाठीत घाटीत दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. 

३) फुले नगर उस्मानपुरा येथील ५२ वर्षीय महिलेला २७ जून रोजी घाटीत दाखल केले होते. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. 

४) दलालवाडी येथील ५५ वर्षीय पुरुषाला ०३ जून रोजी घाटीत ऍडमिट करण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारसुरु असताना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. 

५) अजिंठा सिल्लोड येथील ७८ वर्षीय महिलेला ३० जून रोजी घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. १ जुलै ला तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ३ जुलै रोजी उपचारादरम्यान रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला. 

६) आलंगीर कॉलनी येथील सोहेल गार्डन येथील ५२ वर्षीय पुरुषाला ३० जून रोजी घाटीत दाखल करण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आला. ०३ जुलै रोजी सकाळी ८.५० मिनिटाने मृत्यू झाला. 

७) बजाजनगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीला २९ जून रोजी घाटीत दाखल करण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान ०४ जुले रोजी सकाळी ८.१० वाजता मृत्यू झाला.

जिल्ह्यात २९८९ रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १३८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये ७८ पुरूष, ६० महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६४०२ कोरोनाबाधित आढळले असून ३१२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आता २९८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ७९५ स्वॅबपैकी १३८ अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (१०१)

रघुवीर नगर (१), आलमगीर कॉलनी (१), हर्सुल (३), शाह बाजार (१), मुकुंदवाडी (१), आंबेडकर नगर (१), नवाबपुरा (३), लोटा कारंजा (१), बाबू नगर (५), जाधववाडी (१), गुलमोहर कॉलनी (५), देवळाई परिसर (२), कांचनवाडी (४), सहकार नगर (१), रेल्वे स्टेशन परिसर (२), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (२), उल्कानगरी, गारखेडा (२), बंबाट नगर (२), मिसारवाडी (८), हर्ष नगर (१), एन बारा (१), एन अकरा, सिडको (३), नवजीवन कॉलनी (२), हडको (१), छावणी (२), एमजीएम परिसर (१), पडेगाव (३), गजानन कॉलनी (१०), पद्मपुरा, कोकणावाडी (३), गादिया विहार (२), बुड्डी लेन (१), सिडको (४), तारक कॉलनी (२), उस्मानपुरा (१), क्रांती चौक (२), राम नगर (१), समता नगर (२), मिलिंद नगर (१), अरिहंत नगर (५),  विठ्ठल नगर (६),  शिवेश्श्वर कॉलनी, मयूर पार्क (१)


ग्रामीण भागातील रुग्ण (३७)
रांजणगाव (२), गोंदेगाव (१), डोंगरगाव (१), द्वारकानगरी, बजाज नगर (२), वाळूज महानगर सिडको, बजाज नगर (५), जिजामाता सो., वडगाव (१), जीवनधारा सो., बजाज नगर (३), सिडको महानगर (१), सपना मार्केट जवळ, बजाज नगर (१), वडगाव कोल्हाटी (१), इंड्रोस सो., बजाज नगर (१), विश्वविजय सो., बजाज नगर (१), कृष्णकोयना सो., बजाज नगर (२), वडगाव, बजाज नगर (२), धनश्री सो., बजाज नगर (१), सायली सो., बजाज नगर (१), प्रताप चौक, बजाज नगर (२), श्रीराम सो., बजाज नगर (१), शनेश्वर सो., बजाज नगर (१), वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर (१), साजापूर (१), सारा परिवर्तन सावंगी (३), कुंभारवाडा, पैठण (१) फत्ते मैदान, फुलंब्री (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com