esakal | Corona Update : औरंगाबादेत आज ४२३ पॉझिटिव्ह, १३ बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg
  • - जिल्ह्यात २१ हजार २१० झाले बरे 
  • - ५ हजार ७०७ रुग्णांवर उपचार सुरू 

Corona Update : औरंगाबादेत आज ४२३ पॉझिटिव्ह, १३ बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. ११) ४२३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर चोवीस तासात १३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार ७१२ झाली. आजपर्यंत एकूण ७९५ जणांचा मृत्यू झाला असुन सध्या ५ हजार ७०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अँटीजेन टेस्टमध्ये सिटी एंट्री पॉइंटवर ९२, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १०२ व ग्रामीण भागात ४८ रुग्ण आढळले आहेत. आज ५०६ जणांना सुटी झाली. यात शहरातील ४१४ व ग्रामीण भागातील ९२ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत २१ हजार २१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

ग्रामीण भागातील - (कंसात रुग्णसंख्या) 

साठे नगर, वाळूज (१), वडगाव कोल्हाटी (१), केकटजळगाव, पैठण (१), टाकळी सागज, वैजापूर (१), बाबरा, फुलंब्री (१), औराळा, कन्नड (१), विटा कन्नड (१), रोटेवस्ती, वैजापूर (१), अन्नपूर्णा नगर, पैठण (१), देवगिरी नगर, बजाज नगर (१), जय भवानी कॉलनी, बजाज नगर (१), जय भवानी चौक, भाजी मंडई परिसर, बजाज नगर (१), गोदावरी सो., बजाज नगर (१), मनिषा नगर,वाळूज (१), गणेश नगर, वाळूज (२), शिवाजी चौक, विटावा (२), न्यू हनुमान नगर, वाळूज (१), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (२), मारोती मंदिर, कासोदा (१), पिशोर (५), शिऊर (१), तितरखेडा लोणी (१), हस्ता, कन्नड (२), करमाड (२), खुलताबाद (२), पाचोड (५), राम नगर, पैठण (२), नाथ विहार,पैठण (१), नारळा, पैठण (५), पीठ उंबर गल्ली, पैठण (२), पिंपळवाडी, पैठण (१), शिवनगर, पैठण (१), इसारवाडी, पैठण (१), रेहाना कॉलनी, गंगापूर (१), लासूर स्टेशन (२), शिक्षक कॉलनी, गंगापूर (१), जामगाव, गंगापूर (१०), लासूर रोड, गंगापूर (४), लखमापूर, गंगापूर (१), बगडी, गंगापूर (१), समता नगर, गंगापूर (१), शिवराई, गंगापूर (१), सोनार गल्ली, गंगापूर (१), उपजिल्हा रुग्णालय परिसर, गंगापूर (२), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), भवन, सिल्लोड (१), टिळक नगर, सिल्लोड (१), उकडगाव, वैजापूर (२), आंबेडकर नगर, वैजापूर (१), फुलेवाडी, वैजापूर (१), व्यंकटेश नगर, वैजापूर (१), म्हसोबा चौक, वैजापूर (१), अगरसायगाव (२), भारतवाडी, टाकळी सागज (२), बोराड वस्ती, हिलालपूर (६), औरंगाबाद (१९), फुलंब्री (१), गंगापूर (३), कन्नड (४), सिल्लोड (१०), वैजापूर (४), पैठण (४), सोयगाव (३) 
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरातील बाधीत ः 

पैठण गेट (१), देवानगरी (१), घाटी परिसर (१), अन्य (४), बुड्डीलेन (१), नॅशनल कॉलनी (१), शिवज्योती कॉलनी (१), सुधाकर नगर (१), रचनाकर कॉलनी (४), वेदांत नगर (४), गांधी नगर (१), बन्सीलाल नगर (६), क्रांती चौक पोलिस स्टेशन परिसर (१), लालमन कॉलनी (३), पद्मपुरा (१), सारा प्रभावती सो., सावंगी (१), बालाजी नगर (१), सावंगी (१), उस्मानपुरा (१), एन नऊ सिडको (१), प्रताप नगर (१), स्नेहवर्धिनी कॉलनी, जवाहर नगर (१), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (१), सातारा पोलिस स्टेशन परिसर (१), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (१), ऑरेंज सिटी, सातारा परिसर (२), एचपी गॅस एजन्सी, सातारा परिसर (१), सहकार नगर (२), भारतमाता नगर (१), एन बारा हडको (१), एन नऊ शिवनेरी कॉलनी (१), एन सात, पोस्ट ऑफिस जवळ (२), पारिजात नगर (२), एन दोन न्यू एस टी कॉलनी (१), एन बारा भारतमाता मंदिर (१), एन अकरा सुदर्शन नगर (१), कैलाश नगर (१), मिटमिटा (२), संजय नगर (१), देवळाई परिसर (३), जय भवानी नगर (१), एन बारा टीव्ही सेंटर (१), गारखेडा परिसर (२), देशमुख नगर (१), चुना भट्टी (१), पुंडलिक नगर (१), तारांगण नगर (३), राधास्वामी कॉलनी (१), एन दोन सिडको (१), राम नगर (१), मयूर पार्क (१), मुकुंदवाडी (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), हर्सुल (२), हर्सुल सावंगी (१), सिडको (१), सौजन्य नगर, बालाजी नगर (१) 

सिटी एंट्री पॉइंटवरील बाधीत -

वाळूज एमआयडीसी (३), न्यू सौजन्य नगर (१), सिडको पाणी टाकीजवळ (१), शहानूर वाडी (१), रांजणगाव (२), नाईक नगर (१), शाहू नगर (१), एएस क्लब जवळ (२), पडेगाव (१), गजानन नगर (१), व्हीजन सिटी कांचनवाडी (१), निपाणी (१), भारतमाता नगर (२), बेगमपुरा (२), न्यू हनुमान नगर (१), अजिंठा, सिल्लोड (१), एन एक सिडको (१), शेंद्रा एमआयडीसी (२), एन बारा टीव्ही सेंटर (१), जवाहर कॉलनी (१), बजाज नगर (६), गंगापूर (१), साऊथ सिटी (१), एन चार पारिजात नगर (१), जाधववाडी (२), आडगाव, कन्नड (१), एन आठ सिडको (७), एन दोन सिडको (२), एन अकरा, टी व्ही सेंटर (५), राधास्वामी कॉलनी (१), समृद्धी महामार्ग कर्मचारी (१), नवजीवन कॉलनी (१), पिसादेवी (४), हर्सुल सावंगी (१), एन सात सिडको (१), शेंद्रा एमआयडीसी (१), शेंद्रा (२), सुंदरवाडी (१), मयूर पार्क (१), कुंभेफळ (१), चिकलठाणा (३), टोणगाव (१), उत्तरानगरी (१), एन सहा सिडको (२), कांचनवाडी (६), पैठण (२), बीड बायपास (४), सातारा परिसर (१), नारेगाव (१), विजयंत नगर (२), पडेगाव (१) 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


औरंगाबादेत १३ कोरोनाबाधीतांचा मृत्यू 

औरंगाबादेत तेरा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला. यात तीन महिला व दहा पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७९५ जणांचा बळी गेला आहे. मृतात भोकरदन (जि. जालना) व रिसोड (जि. वाशीम), श्रीरामपुर (जि, अहमदनगर) येथील रुग्णांचाही समावेश आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

रिसोड (जि. वाशीम) येथील ३० वर्षीय पुरुषाचा दोन सप्टेंबरला दुपारी सव्वा चारच्या सुमारास मृत्यू झाला. गंगापुर येथील ५१ वर्षीय पुरुषाचा दहा सप्टेंबरला रात्री साडे आठच्या सुमारास मृत्यू झाला. कन्नड येथील ७३ वर्षीय पुरुषाचा दहा सप्टेंरला सायंकाळी चार वाजुन वीस मिनिटांनी मृत्यू झाला. रांजणगाव, शेणपुंजी येथील ६० वर्षीय पुरुषाचा नऊ सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. भोकरदन (जि. जालना) येथील ५८ वर्षीय पुरुषाचा १० सप्टेंबरला सायंकाळी पावने सातच्या सुमारास मृत्यू झाला. चिकलठाणा येथील ७० वर्षीय पुरुषाचा दहा सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. टाकळी सागज (ता. वैजापूर) येथील ४५ वर्षीय पुरुषाचा आज (ता. ११) पहाटे कोरोना साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. टिळकनगर, श्रीरामपुर (जि. अहमदनगर) येथील ४८ वर्षीय महिलेचा १० सप्टेंबरला रात्री साडे दहाच्या सुमारास मृत्यू झाला. 

हमालवाडा, रेल्वेस्थानक येथील ४९ वर्षीय पुरुषाचा दहा सप्टेंबरला दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी मृत्यू झाला. बगडी (ता. गंगापुर) येथील ५० वर्षीय पुरुषाचा नऊ सप्टेंबरला रात्री पावने दहाच्या सुमारास मृत्यू झाला. अडगाव (ता. कन्नड) येथील ४४ वर्षीय पुरुषाचा दहा सप्टेंबरला रात्री साडे दहाला मृत्यू झाला. लाडसावंगी येथील ६० वर्षीय महिलेचा आज (ता. ११) पहाटे साडे सहाच्या सुमारास मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात नागद (ता. कन्नड) येथील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.