घरोघरी स्क्रीनवरील वेळ वाढला 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः लॉकडाउनमुळे सर्व जण घरातच आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना घराच्या बाहेर पडू देत नाहीत. त्यामुळे दिवसभर घरात विरंगुळाच नसल्यामुळे मुले टीव्हीवर कार्टून पाहण्यात दंग झाली आहेत; तसेच दूरदर्शनवर सध्या ८०-९० च्या दशकातील मालिका सुरू केल्यामुळे पालकांचीही करमणूक होत आहे. त्यामुळे कार्टून वाहिन्यांबरोबरच दूरदर्शनचा टीआरपी कमालीचा वाढला आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करून सुट्या दिल्या आहे. त्यामुळे दिवसभर मुले घरात कंटाळून गेली आहेत. घराबाहेर पडावे तर पालक ओरडतात. म्हणून मुलांसाठी टीव्हीशिवाय दुसरा विरंगुळाच राहिलेला नाही. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळी दूरदर्शनवर रामायण संपले, की घराघरात छोटाभीम, शिनचॅन, कॉक्रोज ॲण्ड ऑगी, मोटू पतलू, छोटा सिंघम अशा आवडत्या कार्टून पात्रांचा धुमाकुळ सुरू होतो. मुलं कार्टून पाहून कंटाळले, की पालक दूरदर्शनवर महाभारत, जंगलबुक, चाणक्य, देख भाई देख, शक्तिमान, व्योमक्य बक्षी हे जुन्या काळातील कार्यक्रम पाहत आहेत. तसेच सध्या नवीन चित्रपटही वाहिन्यांवर झळकताना दिसत आहेत. टीव्हीवर कार्टून पाहण्याचा कंटाळा आला, की मुले पालकांचा मोबाईल हट्टाने घेऊन ऑनलाइन गेम खेळत आहेत. तर तरुणाई चोविसतास मोबाईल इंटरनेटवर गेम खेळताना दिसत आहे. त्यात  पब्जी, लुडो,रमी अशा खेळांनी तरुणाईला वेड लावले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मैदानी खेळाला बंधन 
उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणे, मनसोक्त मैदानावर खेळणे, विविध शिबिरात सहभागी होणे, मित्रांसोबत गप्पा मारत फिरणे कोरोनामुळे यातील काहीच नसल्यामुळे मुलांच्या स्वभावात चिडचिडेपणा आला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव कार्टून वाहिन्या पाहू देण्याची वेळ पालकांवर आली आहे. त्यामुळे कार्टून वाहिन्यांवरील मोटू पतलू, छोटाभीम, डोरेमोन, लिटिल सिंघम या पात्रांनी मुलांच्या मनावर गारूड घातले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com