
औरंगाबाद : औरंगाबादेत आज (ता. १०) तब्बल ११४ जणांचा अहवालकोरोना पॉझिटिव्ह आला आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. दुसरी गंभीर बाब अशी की २६ तासातच ८ जणांचा कोरोना आणि इतर व्याधींनी मृत्यू झाला. आता जिल्ह्यात ८६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
८ मे रोजी १०० रुग्ण, १५ मे रोजी ९३ रुग्ण बाधित झाले होते. ही लॉकडाउनमधील स्थिती होती. अनलॉक-१ मध्ये संसर्ग वाढत असून एक दिवस (४५ रुग्ण ) वगळता बाधितांचा आकडा ७० व त्यापेक्षा अधिक आहे. ९ जूनला ८१ रुग्ण आणि आज ११४ जण बाधित झाल्याने आता दोनच दिवसात रुग्णाचा आकडा दोनशेच्या आसपास (१९५ ) गेला आहे. आता जिल्ह्यात २ हजार २६४ रुग्ण झाले आहेत. तर १ हजार २८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
११७ जणांचा बळी
आतापर्यंत ११६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता कोरोना आणि इतर व्याधींनी होणारे मृत्यू रोखण्याची गरज अधिक आहे. तसेच नागरिकांनीही घराबाहेर पडताना अधिक सुरक्षित राहण्याची आणि विशिष्ट अंतर राखून व्यवहार करण्याची अधिक गरज आहे. हे केल्यासच संसर्गाचा आलेख कमी होऊ शकेल.
आज आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -
कैलास नगर (२), कटकट गेट (१), संसार नगर (१), बारी कॉलनी (२),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (१), औरंगपुरा (१),सिडको एन सात (२),अरिहंत नगर (१), न्याय नगर, गारखेडा (१), संजय नगर, बायजीपुरा (१), शांतीनिकेतन कॉलनी (१), गजानन नगर, गारखेडा (१), भानुदास नगर (१), गारखेडा परिसर (५), सारंग सोसायटी (२), सहयोग नगर (२),सिटी चौक (१), खोकडपुरा (१), फाहेत नगर, राहत कॉर्नर (३), हर्ष नगर (२), बाबर कॉलनी (१), टिळक नगर (२), शहा बाजार (१), पडेगाव (३), शिवाजी नगर (१), बेगमपुरा (२), बजाज नगर,सिडको (१), जुना बाजार (१), मुलमची बाजार,सिटी चौक (२), मयूर नगर, एन अकरा (३), एन- आठ (२), आकाशवाणी परिसर (१), मसोबा नगर (१), एन- अकरा (१), एन -चार, सिडको (१), विशाल नगर (१), आदिनाथ नगर, गारखेडा (२), जाधववाडी (१), टी. व्ही. सेंटर (१), आरटीओ ऑफिस परिसर (१),चित्रेश्वर नगर (१), बीड बायपास (१), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (२), रोकडिया हनुमान परिसर (१), मस्के पेट्रोलपंपाजवळ (१), प्रताप नगर,सिडको (१), एन - सहा, साई नगर,सिडको (१), बंजारा कॉलनी (१), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (१), ज्योती नगर, दर्गा रोड (१), इंदिरा नगर, बायजीपुरा (१), सावरखेडा, ता. सोयगाव (२), कन्नड (१), सिता नगर, बजाज नगर (५), बजाज नगर परिसर (११), सिडको वाळूज महानगर एक (२), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (१), वडगाव कोल्हाटी (१), गणेश नगर, पंढरपूर (२), अन्य (१६) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ३९ महिला आणि ७५ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
दुभत्या गायी आणायच्या कशा ?
कोरोना मीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.