esakal | पाचोडला कार-दुचाकीची धडक; दोघे ठार, एक जण गंभीर जखमी.  
sakal

बोलून बातमी शोधा

accident.jpg

औरंगाबादहून बीडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने दोघे जण ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता.तीन) सायंकाळी घडली.

पाचोडला कार-दुचाकीची धडक; दोघे ठार, एक जण गंभीर जखमी.  

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबादहून बीडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने दोघे जण ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता.तीन) सायंकाळी घडली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
अधिक माहिती अशी, आडगाव जावळे येथील बप्पासाहेब भाऊसाहेब भावले (वय ४२), ताराबाई डिगंबर ढेपले (वय ३०), रेखा भागवत चिंतामणी (वय २८, सर्व रा.आडगाव जावळे) हे आपल्या शेतीतील दिवसभराचे काम आटोपून दुचाकीवरुन (एचएच२० डीपी ६३१८) घराकडे येत असताना अचानक औरंगाबादहुन बीडकडे जाणारी भरधाव वेगातील कारने (एमएच १२ डीएफ६०७७) दुचाकीस जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेही जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. घरी पोचण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना हा अपघात घडला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गावाजवळच अपघात झाल्याने क्षणात वाऱ्यासारखी माहिती पसरली. ही माहीती मिळताच येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिका कर्मचारी महेश जाधव, गणेश चेडे, विठ्ठल गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेत टाकले. उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयत नेत असताना रस्त्यातच बप्पासाहेब भाऊसाहेब भावले व रेखा भागवत चिंतामणी (वय २८ वर्षे) हे मरण पावले, तर ताराबाई डिगंबर ढेपले (वय ३० ) हे गंभीर जखमी झाले. कारच्या धडकेने दुचाकीचा पुर्णतः चुराडा झाला असून कार रस्त्यावर आडवी झाल्याने खोळंबलेली वाहतुक पाचोड पोलिसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली. या अपघाताची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edit-pratap awachar)

loading image
go to top