औरंगाबाद : शहर बस घेणार एसटीपासून काडीमोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electric bus
औरंगाबाद : शहर बस घेणार एसटीपासून काडीमोड

औरंगाबाद : शहर बस घेणार एसटीपासून काडीमोड

औरंगाबाद : शहर बससाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने एसटी महामंडळासोबत केलेल्या कराराचा फेर विचार केला जाणार आहे. शहर बसला पुढील वर्षात स्वतंत्र करू, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. ३१) सांगितले. (city bus will aside from ST)

हेही वाचा: औरंगाबादेत कचऱ्यात जिवंत काडतुसे आढळल्याने उडाली खळबळ

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने घेतला होता. त्यानुसार टाटा कंपनीकडून १०० बस खरेदी करण्यात आल्या. बस सेवा चालविण्यासाठी वाहक व चालक एसटी महामंडळाकडून घेण्यासंबंधी सामंजस्य करार २०१८ मध्ये करण्यात आला आहे.(Aurangabad Smart City Development Board)

हेही वाचा: औरंगाबादेत युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ,पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. महापालिकेने यापूर्वी खासगी कंत्राटदारामार्फत शहर बससेवा सुरू केली होती; पण ती चार वर्षातच बंद पडली. हा अनुभव लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून कर्मचारी घेण्यासाठी करार करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी २०१९ पासून शहर बससेवा सुरू झाली. दरम्यान, काही महिन्यांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. शहर बससेवा सध्या बंदच आहे. यासंदर्भात प्रशासक श्री. पांडेय यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले नव्या वर्षात शहर बस स्वतंत्र केली जाईल. महामंडळ सध्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडचणीत आहे. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. त्यामुळे शहर बससाठी स्वतंत्र कर्मचारी घेण्याचे नियोजन आहे. येत्या वर्षभरात सामंजस्य कराराचा फेर आढावा घेतला जाईल.

हेही वाचा: औरंगाबाद : गुंठेवारीसाठीही ‘वेटिंग’; एजन्सीकडे अडकल्या शेकडो फायली

३० इलेक्ट्रिक बस घेणार

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शहर बसच्या ताफ्यात ३० इलेक्ट्रिक बस येतील. यातील पाच बस पर्यटनमार्गावर धावतील, २० बस मार्चपर्यंत येतील. असे श्री. पांडेय यांनी नमूद केले. तसेच पाच इलेक्ट्रिक कार २६ जानेवारीपर्यंत खरेदी केल्या जाणार आहेत.(30 electric buses in the city)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad NewsSTcity bus
loading image
go to top