esakal | बाप रे... राज्यातील तब्बल ४ हजार ६९० शाळा होणार बंद ! 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभर खळबळ माजली असून गाव तीथे शाळा ही शिक्षण योजना कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे

बाप रे... राज्यातील तब्बल ४ हजार ६९० शाळा होणार बंद ! 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. याच  पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाने राज्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या चार हजार ६९० शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वाधिक सातशे शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. तर सर्वात कमी म्हणजे २१ शाळा बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. 

शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभर खळबळ माजली असून गाव तीथे शाळा ही शिक्षण योजना कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दशकापासून राज्य सरकारने वीस पटाखालील शाळा बंद करण्याच्या हालचाली सातत्याने सुरु होत्या. मात्र, शैक्षणिक क्षेत्रातून विरोध होताच या हालचाली थांबत. परंतू, सध्या कोरोनाच्या थैमानामुळे राज्य आर्थिक संकटात सापडले आहे. हेच कारण पुढे करत शासनाने दहा पटाखालील शाळा बंद करण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहेत. 

अस्वस्थ वर्तमान - वाचा...

शिक्षकांच्या वेतनावर होणारा खर्च, सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेवर होणारा खर्च लक्षात घेता शासनावर कोट्यवधींचा बोजा पडतो. त्यामुळे शासनाने १० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून या शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिक्षण सचिवांच्या एका बैठकीत कमी पटसंख्येच्या राज्यात पाच हजार शाळा बंद करण्याचे टार्गेट होते, त्यानुसार राज्यातील तब्बल ४ हजार ६९० शाळांची यादी तयार झाली आहे. 

 वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली- सविस्तर वाचा
 
राज्यात चिंतेचे वातावरण 
दहा किंवा त्यापेक्षा कमी पटाच्या शाळा बंद होणार अशी भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. शिक्षण अधिकार कायद्यानुसार मुलाला त्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या आत प्राथमिक तर तीन किलोमीटरच्या आत उच्च प्राथमिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. कमी पटाच्या शाळा बहुतांश दुर्गम भागात आहेत. या दुर्गम भागात वाहने, रस्ते, शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहातील. त्यामुळे या शाळा शासनाने बंद करु नयेत अशी मागणी शिक्षण समितीचे राज्यध्यक्ष उदय शिंदे, राज्य सचिव विजय कोंबे यांनी शासनाकडे केली आहे. 

 HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

दहा पटसंख्येच्या 
शाळा व जिल्हे 

नगर ९२, अकोला ५५, अमरावती १२१, औरंगाबाद ६२, भंडारा २९, बीड १०२, बुलढाणा-२४, चंद्रपूर- १३३, धुळे- १२, गडचिरोली- ३८४, गोंदिया-६३, हिंगोली- ३०, जळगाव- २१, जालना- २६, कोल्हापूर- १४१, लातूर- ५४, नागपूर- १२८, नांदेड- १३३, नंदुरबार- ३३, नाशिक- ९४, उस्मानाबाद- २७, पालघर- ८८, पुणे- ३७८, रायगड- ५७३, रत्नागिरी-७००, सांगली- ७७, सातारा- ३७०, सिंधुदुर्ग- ४४१,

loading image