टेस्टिंग अन..कोरोनाबाधितांची संख्याही मंदावली, औरंगाबाद @१३६० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

CoronaVirus Image
CoronaVirus Image

औरंगाबाद :जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत पाच दिवसात अनुक्रमे ३२ व ३०,  ३७  व २०, ३० रुग्ण आढळल्यानंतर बुधवारी ( ता.  २७) ३० रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ३६० झाली आहे. तर दोघांचा कोरोना आणि इतर आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे आता बळी गेलेल्यांची संख्या ६१ झाली. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेषतः पूर्वीपेक्षा टेस्टिंग कमी होत असून दुसरीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -
गंगापुर (१), मिसारवाडी (१), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (१), शहानवाज मस्जिद परिसर (१), सादात नगर (१), भवानीनगर, जुना मोंढा (१),जुना बाजार (१),जहागीरदार कॉलनी (२),ईटखेडा परिसर (१),जयभिम नगर (१), शिवशंकर कॉलनी (२), सुभाषचंद्र बोस नगर (४), अल्तमश कॉलनी (१), शिवनेरी कॉलनी एन-९ (१), टिळक नगर (१), एन-४ सिडको (१), रोशन गेट परिसर (१), सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर (१), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (१), भाग्यनगर (१),  जय भवानी नगर (३), समता नगर (१), सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ०९ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

आतापर्यंत ८१२ जण कोरोनामुक्त
औरंगाबाद शहरातील महापालिका कोविड केअर केंद्र असलेल्या एमआयटी मुलांचे वस्तीगृह येथून चार, किल्लेअर्क येथून १४,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) ३, जिल्हा रुग्णालयातून ७, खासगी रुग्णालयातून तीन असे एकूण ३० कोरोनाबाधित रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातून ८१२ जण बरे झाले आहेत. असे प्रशासनाने कळवले आहे.    

६० वा मृत्यू
इंदिरानगर, बायजीपुरा येथील ५६ वर्षीय पुरुषाला २५ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. ताप येणे,  दम लागणे व खोकला ही लक्षणे त्यांना होती. मागील चार दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना घाटीच्या कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात संशयित म्हणून भरती करण्यात आले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यांच्या कोरोना चाचणीसाठी लाळेचे नमुने घेऊन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांना पूर्वीपासून मधुमेह व उच्च रक्तदाब हा आजार होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २५ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल प्रतीक्षेत असल्याने मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता.  २६ मे रोजी साडेसहाच्या सुमारास कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. तो पॉझिटिव्ह होता.

६१ वा मृत्यू
हुसेन कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात २४ मे रोजी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास भरती करण्यात आले. त्यांना दम लागणे,  खोकला, ताप आणि छातीत धडधड होणे ही लक्षणे होती. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही ६० टक्के इतकेच होते. त्यांची प्रकृती गंभीर होती.

त्यांच्यावर कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची कोरोना चाचणीसाठी लाळेचे नमुने २४ मे रोजी घेण्यात आले. त्याचा अहवाल २५ मे रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले मात्र दोन्ही फुप्फुसांचा न्यूमोनिया झाल्यानंतर २६ मे रोजी सांयकाळी साडे सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण            - ८१२
उपचार घेणारे रुग्ण         - ४८७
एकूण मृत्यू                -   ६१
जिल्ह्यातील एकूण रुग्ण -  १३६०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com