
छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात गेल्या वर्षभरात वीजचोरीची ४,४२५ प्रकरणे उघडकीस आली. त्यांनी सात कोटी ८७ लाख रुपयांची वीजचोरी केली आहे. महावितरणने वीजचोरांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. यातील तब्बल ३५० प्रकरणांत पोलिसांत गुन्हे नोंद झाले.