छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वादातून गळा आवळून खून केल्याची घटना न्यायनगर भागात समोर आली. गौतम महादेव सदावर्ते (वय ४६ रा. न्यायानगर) असे मृताचे नाव आहे. गौतम यांनी आत्महत्या केल्याचा बनाव आरोपीने रचला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. .गौतम हे कुटुंबीयांसह न्यायनगर भागात राहत होते. खासगी काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. कौटुंबिक कार्यक्रमासाठी नात्यातील एक व्यक्ती हा रविवारी (ता. १३) शहरात आला होता. .गौतम आणि ती व्यक्ती रविवारी दिवसभर सोबत फिरले. सायंकाळी गौतम यांचे कुटुंबीय कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी गौतम आणि ती व्यक्ती दोघे घरीच होते. या दोघांनी सोबत जेवणही केले. मध्यरात्री १ वाजता कुटुंबीय घरी पोचले. त्यावेळी गौतम हे बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. गौतम यांनी गळफास घेतल्याचे सोबतच्या व्यक्तीने सांगितले..अडकला शवविच्छेदनाचा अहवालामुळेमंगळवारी सकाळी पुंडलिकनगरचे निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घाटीत जाऊन डॉक्टरांशीही चर्चा केली. गौतम यांनी गळफास घेतल्याची माहिती सोबत असलेल्या संशयिताने दिली. .Illegal Money lending : अवघ्या २५ हजारांसाठी बळकावले घर; अवैध सावकारी प्रकरणावर सुनावणी, गुन्हा नोंद होणार.परंतु, मंगळवारी दुपारी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये गौतम यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची गळ आवळून हत्या झाल्याचे समोर आले. अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.