Aurangabad News Seva Foundation
Aurangabad News Seva Foundation

सेवा फाऊंडेशनतर्फे चार हजार कुटूंबांना महिन्याचा किराणा

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा चार हजारांवर गरजूंना सेवा फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे. फाऊंडेशनचे ५५ स्वंयसेवक कानाकोपऱ्यातील गरजूंचा शोध घेवून महिनाभर पुरेल एवढ्या किराण्याची सोय करत आहेत. अशी माहिती सुमीत खांबेकर यांनी दिली.

राज्य शासनाने २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केलेला तो ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. घरातील किराणा संपला आहे. त्यांच्या मदतीला सेवा फाऊंडेशन धावून येत आहे. फाऊंडेशनने सोशल मिडीयावर गरजूंना मदत करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत फाऊंडेशनकडे धान्य जमा झाले.

फाऊंडेशनच्या स्वंयसेवकांनी श्रमदान करत ‘किराणा किट’ तयार केल्या. यात महिनाभर पुरेल एवढे गहू, तांदूळ, साखर, दाळ आणि दैनंदिन गरजेचे साहित्य आहे. स्वंयसेवकांनी गरजूंची यादी तयार केली. त्यानंतर अंतिम यादी तयार केली जाते. त्यानुसार एक स्वंयसेवक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत १० घरात किट पोहचवतो. दररोज ५०० ते ७०० किट तयार केल्या जातात.

ज्योतीनगर, पीरबाजार, एकनाथनगर, मयूरबन कॉलनी, इंदिरानगर, पुंडलिकनगर, हनुमाननगर, आंबेडकरनगर, आरतीनगर, बजरंग चौक, सातारा, देवळाई, औरंगपूरा, मिलकॉर्नर, भावसिंगपुरा, मुकुंदवाडी, अविष्कार कॉलनी, गणेशनगर, अयोध्यानगर, ब्रीजवाडी, मोंढा, फुलेनगर, उस्मानपुरा आदी भागात मदतीचा हात पोहचवण्यात आला आहे.

सेल्फी, सोशल मिडीयाला टाळले
फाउंडेशनने बालकाश्रम, अंध कुटूंब, विद्यार्थ्यांनाही मदतीचा हात दिला. मदतीचे साहित्य पोहचवतांना सेल्फी किंवा सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करणे टाळण्याचा नियम कटाक्षाने पाळला जात आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कार्यात संदीप आरख, शेखर म्हस्के, गोकुळ मखलेजा, प्रतीक गायकवाड, मनोज जैन, राहुल टेटवार, मयुरी व्यवहारे, संदीप मिटे, शैलेश पवार, आशिष भालेराव, अफसर शेख, संदीप जैन, नितीन कुलकर्णी, बापू आव्हारे, सुनील खरात, निखिल मित्तल, रोहित मगर पाटील, शुभम लोहाडे, आशिष पावडे, शेखर नागरे, तुषार भारती, सुनील गायकवाड, भरत शहा, समीर कडेठानकर, सतीश लोणीकर, हनुमान शिंदे, सुधीर शेवाळे, अभय देशपांडे, प्रवीण वनगुजरे, विकास राऊत, अभिजित जीवनवाल आदींची मदत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com