esakal | कोरोनाशी लढ्यात शांतिगिरी महाराजांचा पुढाकार : जय बाबाजी भक्त परिवाराकडून २२ लाख
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराने कोरोना महामारीच्या लढ्यात सहभाग म्हणून २२ लाख २३ हजार ९९८ रुपयांचा निधी दिला. ही रक्कम प्रधानमंत्री सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली. 

कोरोनाशी लढ्यात शांतिगिरी महाराजांचा पुढाकार : जय बाबाजी भक्त परिवाराकडून २२ लाख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराने कोरोना महामारीच्या लढ्यात सहभाग म्हणून २२ लाख २३ हजार ९९८ रुपयांचा निधी दिला. ही रक्कम प्रधानमंत्री सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली. 

महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवार प्रत्येक आपत्तीच्यावेळी नेहमीच धावून जातात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीमुळे जय बाबाजी भक्त परिवाराने औरंगाबाद, जालना, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, पुणे आदी ज्या ठिकाणी जय बाबाजी भक्त परिवाराचा मोठा प्रभाव आहे अशा भक्तांना व जनतेला प्रत्येकाने फक्त शंभर रुपये योगदान या निधीत देण्याचे आवाहन करण्यात आले. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी केलेल्या संकल्पानुसार एकाच दिवसात योगदान जमा करण्याच्या आव्हानाला जनता जनार्दनांनी भरभरून प्रतिसाद दिला. बाबाजींनी स्थापन केलेल्या जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज संस्कारित विश्वशांती धाम निर्माण संस्थेच्या बँक खात्यात एकाच दिवसात म्हणजे ऑनलाइन स्वरूपात २२ लाख २३ हजार ९९८ रुपये जमा झाले. 

धनादेश केले सुपूर्द

हा निधी धनादेश स्वरूपात मंगळवारी (ता. २१) जय बाबाजी भक्त परिवाराने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन कोरोना सहायता निधीसाठी जमा केला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान सहायता निधीसाठी ११ लाख ११ हजार ९९९ व महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख ११ हजार ९९९ असा २२ लाख २३ हजार ९९८ रुपयांचा धनादेश कोरोना सहायता निधीमध्ये स्वामी श्री श्री १००८ महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते जमा करण्यात आला. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार, प्रा. राजेश सरकटे, सचिव गणेश बोराडे, रामानंद महाराज, संजय सरकटे उपस्थित होते. कोरोनामुक्तीसाठी प्रशासन वेळोवेळी जे आदेश देत आहे त्याचे सर्वांनी पालन करावे असे आव्हान महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी यावेळी केले. 

loading image