

Economic Offences Wing Probes Multi-Crore Crop Subsidy Fraud
sakal
घनसावंगी : पीक नुकसान अनुदान वाटप घोटाळ्याच्या चौकशीत घनसावंगी तालुक्यातील बहिरेगावातील १३९ शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले. मात्र, यातील केवळ ३७ शेतकरी गावातील असून, उर्वरित १०२ नावे अन्य ठिकाणची असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, बोगस नावे शोधण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे.