बापरे..! आज दिवसभरात शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त कोरोनाबाधीत, नऊ हजार पार

File Photo
File Photo

औरंगाबाद : औरंगाबादेत लॉकडाऊनच्या काळात जास्त टेस्टींग होत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज (ता .१४) २५१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात महापालिका क्षेत्रातील ११७ व ग्रामीण भागातील १३४ रुग्ण आहेत. आता ३ हजार ३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात आज १२६ जणांना सुटी देण्यात आली. यात महापालिका क्षेत्रातील १०० व ग्रामीण २६ जण आहेत. आजपर्यंत ५ हजार ३५५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ हजार ६५ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३६४ जणांचा मृत्यू झाले. 

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत ९३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहर प्रवेशद्वारावर ३८ आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाने घेतलेल्या चाचणीत ५५ रुग्ण आढळलेले आहेत. 

शहरातील बाधित रुग्ण - 

घाटी परिसर (३), शंभू नगर (१), सादात नगर (१), रमा नगर (१), शिव नगर (१), इटखेडा (३), राजाबाजार (१), जाधवमंडी (२), जटवाडा रोड (१), किराडपुरा (१), दाना बाजार (१), एन दोन सिडको (१),

एन दोन, हडको (१), एन चार सिडको (४), गांधी नगर (१), कॅनॉट प्लेस (१), ज्योती नगर (१), माऊली तरंग (१), भारत नगर (२), जाफर गेट (१), क्रांती नगर (१), सेना नगर, बीड बायपास (१), शाहिस्ता कॉलनी (१), नवनाथ नगर (१), विवेकानंद नगर (२), सिल्क मिल कॉलनी (१), नगारखाना, गुलमंडी (१), घाटी परिसर (१), अन्य (४), नेहरू नगर (४), भवानी नगर (४), मयूर नगर (१७), शिवाजी नगर (२), नक्षत्रवाडी (६), एसबीआय सिडको (३), अमृत साई प्लाजा (६), शांती निकेतन (९), समता नगर (७), औरंगाबाद (२), सादातनगर (१), टीव्ही सेंटर (१), एन तीन (२), एन तेरा (१), कांचनवाडी (५), इटखेडा (३) 

ग्रामीण भागातील बाधित रुग्ण - 

वाळूज (१), गणेश कॉलनी, सिल्लोड (१), बजाज नगर (१), मारवाडी गल्ली, लासूरगाव (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (५) स्वस्त‍िक नगर, बजाज नगर (१), हतनूर, कन्नड (१०), माळी गल्ली, रांजणगाव (१), दत्त नगर, रांजणगाव (१), मातोश्री नगर, रांजणगाव (१), आमे साई नगर, रांजणगाव (३), कृष्णा नगर, रांजणगाव (२), स्वस्तिक नगर, साजापूर (१), गणेश वसाहत, वाळूज (१), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (२), बापू नगर, रांजणगाव (४),

शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (१), कमलापूर फाटा, रांजणगाव (१), अन्य (१), फर्दापूर, सोयगाव (६), जयसिंगनगर, गंगापूर (१), बोलठाण, गंगापूर (१), मारवाड गल्ली वैजापूर (१), कुंभार गल्ली, वैजापूर (३) रांजणगाव (७), छत्रपती नगर, रांजणगाव (१) श्रीगणेश वसाहत, वाळूज (१), स्वामी केशवानंद नगर, रांजणगाव (३), दत्त नगर, रांजणगाव (१), विटावा, गंगापूर (६), अजिंक्यतारा सो., जिकठाण (१), साठे नगर, वाळूज (१), जुने रांजणगाव (१), रांजणगाव शेणुपजी (२), विजय नगर, वाळूज (२), संघर्ष नगर, घाणेगाव (१), म्हस्की चौफुली, वैजापूर (१), कुंभारगल्ली, वैजापूर (३), बजाज नगर (२), अजिंठा, सिल्लोड (१), पळशी (१), साऊथ सिटी (१), समर्थ नगर, कन्नड (२), विराज सो., बजाज नगर (१), मनोमय रेसिडन्सी, सिडको महानगर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (१), जय भवानी नगर, बजाज नगर (१), सिडको महानगर दोन (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (२), निलकमल सो., बजाज नगर (१), तिसगाव (७), पारिजात नगर, बजाज नगर (१) द्वारकानगरी, बजाज नगर (३), श्रमसाफल्य सो., बजाज नगर (५), मयूर नगर, बजाज नगर, वडगाव (१), ग्रामीण भागातील रुग्ण (२०) 
कुंभेफळ (१), बाळापूर (२), सावंगी (२), सिडको महानगर (७), बजाज नगर (५), तिसगाव (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

कोरोना मीटर - 
बरे झालेले रुग्ण - ५३५५ 
उपचार घेणारे रुग्ण -३३४६ 
एकूण मृत्यू - ३६४ 
--- 
आतापर्यंत बाधित - ९०६५ 
--- 

औरंगाबादेत सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू 

औरंगाबादेत कोरोनाचा कहर लॉकडाऊनमध्येही सुरुच असुन मृत्यूदरात किंचितशी घट झाली आहे. आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यात तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोना व इतर व्याधीने ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पद्मपुरा येथील ४२ वर्षीय पुरूषाला घाटी रुग्णालयात १ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २८ जुलैला प्राप्त झाला. त्यांचा १३ जुलैला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. आंबेडकर नगर येथील ४९ वर्षीय महिलेला ९ जुलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १० जुलैला प्राप्त झाला. त्यांचा १३ जुलैला रात्री साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. 

औरंगपुरा येथील ६५ वर्षीय पुरूषाला २३ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी प्राप्त झाला. त्यांचा १३ जुलैला मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. रामनगर येथील ६५ वर्षीय पुरूषाला ६ जूलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल ७ जुलैला प्राप्त झाला. त्यांचा १४ जुलैला पहाटे अडीचच्या सुमारास मृत्यू झाला. 

औरंगपुरा येथील ६८ वर्षीय महिलेला ८ जूलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी प्राप्त झाला. त्यांचा १४ जुलैला सकाळी अकराच्या सुमारास मृत्यू झाला. 
भाग्यनगर येथील ७० वर्षीय महिलेला १३ जूलैला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा त्यांचा १३ जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com