Arrested News
Arrested News

कार उभी करुन लघूशंकेला थांबला, तितक्यात ओळखीच्यानेच पळविली कार

Published on

औरंगाबाद: लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाला ओळखीच्याच व्यक्तीने मारहाण करुन त्याच्या मोबाइलसह कार व पाकीटातील १५०० रुपये लंपास करणाऱ्या भामट्याला मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी (ता. २३) पहाटे अटक केली. शरद मारुती पवार (३५, रा. एन २ विठ्ठलनगर, सिडको) असे त्या आरोपीचे नाव आहे.

त्याला सोमवारपर्यंत (ता. २४) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले. प्रकरणात विष्णू आण्णासाहेब शिंदे (४२, रा. एन २ विठ्ठलनगर) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, २० ऑगष्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता शिंदे हे कारने (क्रं. एमएच २० ईज ५१८१) कडेठाण (ता. पैठण) येथून घरी येत होते.

रात्री साडेअकरा वाजता जालना रस्त्यावरील लाईफ हॉस्पीटलजवळ शिंदे लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी तेथे त्यांच्या ओळखीचा तथा आरोपी शरद पवार आला. त्याने शिंदे यांना कोठे गेला होता अशी विचारपुस केली. त्यावर शिंदे यांनी गावाकडे गेले होतो असे सांगितले.

दरम्आयान रोपीने त्यांना मारहाण करुन त्यांचा मोबाइल, १५०० रूपये रोख, पॅन, आधार कार्ड व कार असा एकूण आठ लाख सहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज बळजबरी हिसकावुन नेला. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रकरणाचा तपास सुरु असतांना मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राहुल बांगर व त्यांच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपी शरद पवार हा येरमाळा (जि. उस्मानाबाद) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बांगर व त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. त्याच्या कडुन कार व चारशे रुपये जप्त करण्यात आले आहे.

पोलिस कोठडीत रवानगी

आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे बाकी आहे. गुन्ह्यातील उर्वरित ऐवज जप्त करणे देखील बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले. ॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com