वाळू माफियासोबत पोलिस वानखेडेवर क्रिकेट सामना पाहायला गेले अन..

Relations with sand mafia suspend three police
Relations with sand mafia suspend three police

औरंगाबाद - पोलिस दलातील सचोटी आणि कर्तव्याला फाटा देत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे तीन पोलिस कर्मचारी मटका व वाळू माफियासोबत भारत ऑस्ट्रोलिया क्रिकेट सामना पाहण्यास वानखेडे स्टेडीयमवर गेले. त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले अन..याच व्हायरल फोटोंच्या पुराव्याने त्यांचे निलंबनही झाले. 

पोलिस नाईक लालचंद त्रिंबक नागलोत, शैलेश नारायण गोरे, श्रीकांत गोविंदराव तळेगावे अशी या "बहाद्दर' पोलिसांची नावे आहेत. त्यांची पैठण पोलिस ठण्यात नेमणूक आहे. परंतु याच पोलिस हद्दीत मोठी वाळू तस्करी होते. त्यामूळे वाळू तस्कर आणि पोलिस यांचा चांगला परिचय आहे. काहींचे तर घनिष्ठ "अर्थपुर्ण' संबंध आहेत.

पैठण येथील नाना भिमराव शेंबडे याच्याविरुद्ध 20 डिसेंबर 2019 रोजी अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर आबेद कासम पठाण हा मटका बुकीचालक आहे. त्याच्याविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात मटका जूगाराचे गुन्हे दाखल आहेत. खास म्हणजे त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्तावही पाठविण्यात आलेला आहे. या सर्व बाबी माहिती असतानाही तिघा पोलिसांनी त्यांच्यासोबत मुंबईवारी केली. 

वानखेडेवर पाहीला सामना 
विशेष म्हणजे या तीन पोलिसांनी रजाही मंजुर करुन घेतली होती. त्यानंतर ते वाळू माफिया व मटका बुकीसोबत भारत-ऑस्ट्रोलिया क्रिकेट सामना पाहण्यासाठी आरोपींनी अरेंज केलेल्या महागडी गाडीत मुंबईला गेले. वानखेडे स्टेडीयमवर त्यांनी सामना पाहीला. 

यामुळे अडकले 
क्रिकेट सामना पाहताना त्यांनी सोशल मिडियावर स्वत:चे आरोपींसोबतचे फोटो अपलोड केले. ते फोटो व्हायरल झाले. आरोपींसोबत तिघे पोलिस सामन्यांचा आनंद लुटत असल्याने त्यांना ओळखत असलेले अनेकजण अव्वाक झाले. त्यानंतर ही बाब पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना समजली आणि त्यांनी तिघांना तडकाफडकी निलंबीत केले. 

बेशिस्तीमुळे बडगा 
पोलिस दलाची प्रतिमा उजळ व निष्कलंक ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक पोलिसांवर आहे. परंतु या तिघांकडून जनमाणसांत पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचे काम झाले. बेशिस्त, बेजबाबदारीचे वर्तन केल्याचे दिसून आले. म्हणून त्यांचे निलंबन करुन औरंगाबाद ग्रामीण अधिक्षक कार्यालयाशी सलग्न करण्यात आले. 

 हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com