esakal | औरंगाबाद : सेवानिवृत्त शिक्षकांचा पुढाकार; मुख्यमंत्री सहायता निधीला दिली एवढी रक्कम
sakal

बोलून बातमी शोधा

hand help.jpg

कोरोनाशी लढा देण्यासाठी असोसिएशन ऑफ कॉलेज ॲण्ड युनिव्हर्सिटी सुपर ॲन्युएटेड टीचर्स (ॲक्युसॅट) तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस १४ लाख रूपये देण्यात आले आहेत.

औरंगाबाद : सेवानिवृत्त शिक्षकांचा पुढाकार; मुख्यमंत्री सहायता निधीला दिली एवढी रक्कम

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद  : कोरोनाशी लढा देण्यासाठी असोसिएशन ऑफ कॉलेज ॲण्ड युनिव्हर्सिटी सुपर ॲन्युएटेड टीचर्स (ॲक्युसॅट) तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस १४ लाख रूपये देण्यात आले आहेत. मदतीचा धनादेश संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे सोपविला आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या न्यायालयीन लढ्यासाठी अग्रेसर असलेली ॲक्युसॅट संघटना देशातील कानाकोपऱ्यात आलेल्या आपत्तीत हातभार लावण्यासही पुढे असते. यात २०१५ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा, नाम फाऊंडेशनला एक लाख रूपये, २०१७ मध्ये केरळामधील पुरग्रस्तासाठी १ लाख रुपये, २०१९ च्या कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीतनंतरही पुरग्रस्तांसाठी २ लाख रूपये आर्थिक मदत राज्य शासनास केली होती.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

कोरोनामुळे राज्यात मोठी आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनास मदत केली पाहिजे, अशी भूमिका संघटनेच्या सदस्यांनी मांडली. यानुसार संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. ए. वाहुळ, सचिव डॉ. जे. एम. मंत्री, उपाध्यक्ष डॉ. पी. वाय. मद्वन्ना, कोषाध्यक्ष प्रा. एस. बी. नाफडे, सहसचिव डॉ. एम. एन. जाचक, डॉ. मानसिंग जगताप, डॉ. व्ही. टी. घारपुरे, डॉ. आर. जी. बीडकर, प्रा. बी. बी. देशपांडे, प्रा. ए. बी. पाटील, डॉ. संभाजी  पाटील आदींनी राज्यभरातील संघटनेच्या सदस्याकडुन निधी संकलन केले.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

राज्यभरातून जमा झालेल्या १४ लाख रूपयांच्या निधीचा धनादेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री निधीला सुपूर्द करण्यात आला. यावेळी संघटनेचे डॉ. वाहुळ, डॉ. मंत्री उपस्थित होते. विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संघटनेच्या कामाची माहिती देणारे निवेदनही देण्यात आले आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   ,

(संपादन-प्रताप अवचार)

loading image