औरंगाबादेतील १४ रुग्णालय रडारवर; जादा बिल लावून रुग्णांना ६२ लाखांने लूटले. 

हॉस्पिटल.jpg
हॉस्पिटल.jpg

औरंगाबाद : कोरोना रुग्णांकडून आकाराचे दर राज्य शासनाने निश्‍चित केलेले आहे. मात्र, शहरातील १४ हॉस्पिटलने ६५६ कोरोना रुग्णांकडून ६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम आकारलेली आहे. त्याबाबत २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १४ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस दिलेल्या आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
नोटीसला सात दिवसांमध्ये हॉस्पिटलने समर्पक उत्तर न दिल्यास व बिल कमी करणेबाबत आवश्यक ती कारवाई न केल्यास दंडात्मक किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिलेला आहे. 

आरोग्य विभागाने २१ मे २०२० व ३१ ऑगस्ट २०२० च्या अधिसूचनेनुसार राज्य शासनाने कोरोना रुग्णावर उपचार करताना रुग्णालयांनी आकारावयाचे दर याबाबत परिशिष्ट क नुसार दर निश्चित केलेले आहेत . यामध्ये दवाखान्यातील डॉक्टरची फी चाही समावेश आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांकडून जादा दराने आकारणी करू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. 

मात्र शहरातील बरेच हॉस्पिटलमधून रुग्णांकडून जादा दराने बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक लेखाधिकारी यांची हॉस्पिटल कडून आकारण्यात येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या बिलाची तपासणी करण्यासाठी नेमणूक केली. त्यानुसार या बिलांची सखोल तपासणी करण्यात येत असून तपासणी अंती शहरातील १४ हॉस्पिटलमध्ये ६५६ कोरोना रुग्णाचे बिलाची एकूण ६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम आकारणी केल्याचे निदर्शनास आले आहे. या कारवाई अंतर्गत लाईफलाईन हॉस्पिटलला तीन लाख तीस हजार रुपये पंधरा रुग्णांचे परत करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांकडून आकारलेली अतिरिक्त रक्कम परत केली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली. 


              हॉस्पिटल        रक्कम 

  • अजंता हॉस्पिटल - ६,३२,३०० 
  • सिग्मा हॉस्पिटल - २,११,३५० 
  • एशियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी - ३,९०,६२३ 
  • सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल - २४,७२,३६९ 
  • ओरियन सिटी केअर - ५८,८५० 
  • हयात हॉस्पिटल - ४००० 
  • डॉ. हेडगेवार रुग्णालय - ६,०७,९३२ 
  • कृष्णा हॉस्पिटल - ४,८५,३०० 
  • लाइफ लाइन हॉस्पिटल - ७,३२,६०० 
  • एमआयटी हॉस्पिटल - १,३२,५७१ 
  • वुई केअर नर्सिंग होम- २७,८९९ 
  • एकवीरा हॉस्पिटल - ४००० 
  • वायएसके हॉस्पिटल - २,७४,३०० 
  • अपेक्स हॉस्पिटल - १,९९,२०० 
  • एकूण रक्कम     -६२,३३,२९४ 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com