esakal | शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे : डॉ. येवले
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News BAMU

आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून आपण सर्वांनी मिळून आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता द्यावे. विद्यापीठाने सुरवातीपासूनच स्वच्छतेसंदर्भात विविध उपाय योजना केल्या असून, व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीद्वारे पसरू नये म्हणून शासनाच्या निर्देशनानुसार प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज करावयाचे कळविले आहे.

शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे : डॉ. येवले

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तसेच संलग्नित सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोना विषाणूच्या (कोव्हीड-१९) उपाय योजनेसाठी एक दिवसाचे वेतन मदतीच्या स्वरुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले आहे.

यासंदर्भात विद्यापीठ मुख्य परिसर, उस्मानाबाद उपपरिसर, मॉडेल कॉलेज, घनसावंगी तसेच संलग्नित सर्व महाविद्यालयांना कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने ३० मार्चला परिपत्रक पाठविण्यात आले आहे. यात म्हटले की, आपला देश आणि राज्य सध्या कोरोना व्हायरसच्या अत्यंत गंभीर अशा संकटातून जात आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोरोना व्हायरसचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा - बामुतील बंदला तिसऱ्यांदा मुदतवाढ

देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून आपण सर्वांनी मिळून आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता द्यावे. विद्यापीठाने सुरवातीपासूनच स्वच्छतेसंदर्भात विविध उपाय योजना केल्या असून, व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीद्वारे पसरू नये म्हणून शासनाच्या निर्देशनानुसार प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज करावयाचे कळविले आहे.

हे वाचले का? - बामुतील पदव्युत्तरच्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोनाबाबत अशी घ्या काळजी
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, वारंवार साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना व खोकलतांना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरा, इतरांपासून किमान एक मीटर दूर राहा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या, फळे भाज्या न धुता खाऊ नका; तसेच श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा