esakal | रेडिमेड कपडे बनवून देतो म्हणाले, अन् 22...
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Aurangabad

रेडिमेड कपडे बनवून देण्याची नरसिम्हा नावाची कंपनी आहे. दोघा संशयितांनी खान यांचा विश्वास संपादन करून व्यवसाय करण्यासाठी लागणारे संपूर्ण रेडिमेड कपडे बनवून देण्याची हमी दिली होती. तसेच दुकानाचे भाडे, लाईट बील व एका नोकराचा पगार कंपनीमार्फत दिला जाईल, असे संशयितांनी नफीज यांना सांगितले. 

रेडिमेड कपडे बनवून देतो म्हणाले, अन् 22...

sakal_logo
By
योगेश पायघन

औरंगाबाद : रेडिमेड कपडे बनवून देणाऱ्या एका कंपनीतील दोघांनी शहरातील कापड दुकानदाराला आमिष दाखवून 21 लाख 92 हजार 105 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने नरसिम्हा इंटरप्रायजेसच्या रघुनारायण रेड्डी व कृष्णकुमार (दोघे रा. लक्ष्मी नरसिम्हा क्‍लोथिंग 79, बंगळुरू, कर्नाटक) यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नफीज खान (ओ. के. टॉवरच्या पाठीमागे खोकडपुरा) यांचे कपड्याचे दुकान आहे. संशयित रघुनारायण रेड्डी व कृष्णकुमार यांचे रेडिमेड कपडे बनवून देण्याची नरसिम्हा नावाची कंपनी आहे.

पुष्पा शर्माचे खुनी निघाले बांधकाम मजूर 

दोघा संशयितांनी खान यांचा विश्वास संपादन करून व्यवसाय करण्यासाठी लागणारे संपूर्ण रेडिमेड कपडे बनवून देण्याची हमी दिली होती. तसेच दुकानाचे भाडे, लाईट बील व एका नोकराचा पगार कंपनीमार्फत दिला जाईल, असे संशयितांनी नफीज यांना सांगितले. 

हेही वाचा  राज ठाकरे अडकले, आणि मग...   

दरम्यान, नफीस या आमिषाला बळी पडले. त्यामुळे संशयितांनी त्यांना नरसिम्हा इंटरप्रायजेस या नावाने कंपनीच्या फेडरल बॅंक शाखा बंगळुरू येथील खात्यात ऑक्‍टोबर 2017 ते मे 2018 पर्यंत रोख रक्कम 21 लाख 92 हजार 105 रुपये भरण्यास सांगून त्यांच्यासोबत करार केला.

परीक्षेत पास करतो, म्हणून तिला एकटीलाच बसवले वर्गात

त्यानुसार रोज होणाऱ्या व्यवसायात 25 टक्के कमिशन कंपनीतर्फे तसेच वाहतुकीचा खर्च अर्धा-अर्धा देण्याचे ठरले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे थोडा-थोडा माल नफीज यांना पाठविण्यास सुरवात केली.

संशयितांनी एकूण चार लाख सहा हजार 358 रुपये किमतीचे रेडिमेड कपडे पाठविल्याने नफीज यांना विश्वास बसला. त्यामुळे नफीज यांनी ठरल्याप्रमाणे वरील रक्कम दिली. पैसे मिळताच संशयितांनी कपडे पाठविणे बंद केले.

हे वाचलंत का?- आधीच नवरा, दोन मुले असताना दुसऱ्याशी लग्न : त्यानंच काढलं शोधून 

त्यामुळे नफीज यांनी संशयितांची भेट घेण्यासाठी बंगळुरू गाठले. त्यांनी कंपनीत व त्यांच्या घरीही संशयितांचा शोध घेतला; मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने दोघा संशयितांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

loading image