esakal | केंद्रीयमंत्री गडकरी यांचा दावा ठरला खोटा, औशातील महामार्गाला वर्षभरातच तडे !  
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता.jpg

औसा तालुक्यातुन जाणाऱ्या रत्नागिरी ते वारंगा फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर औशा तालुक्यातील बेलकुंड ते आशीव या दरम्यान गतवर्षी झालेल्या सिमेंट रस्त्याला तडे पडले आहेत. तर तुळजापुर चौक ते लाजना-उमरगा रस्त्याचे काम अजुन संपले नसतांना मागे झालेल्या नविन सिंमेट रस्त्यालाही भेगा पडल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाबाबतचा दर्जाचा दावा सपशेल खोटा ठरला आहे.  

 महामार्गाच्या नव्या रस्त्यांना भेगा. 

केंद्रीयमंत्री गडकरी यांचा दावा ठरला खोटा, औशातील महामार्गाला वर्षभरातच तडे !  

sakal_logo
By
जलील पठाण

औसा (लातूर) : केंद्रीय दळणवळण मंत्री व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे नेहमी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबाबत नेहमीच विश्‍वास व्यक्त करुन नव्याने विकसीत झालेले रस्ते हे दर्जात्मक असल्याचा दावा करतात. मात्र, त्यांच्या या दावा आता सपशेल खोटा ठरु लागला आहे. औसा तालुक्यातुन जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ आता उघडे पडले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


रत्नागिरी ते वारंगा फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर औशा तालुक्यातील बेलकुंड ते आशीव या दरम्यान गतवर्षी झालेल्या सिमेंट रस्त्याला तडे पडले आहेत. औशाच्या तुळजापुर चौक ते लाजना-उमरगा रस्त्याचे काम अजुन संपले नसतांना मागे झालेल्या नविन सिंमेट रस्त्यालाही भेगा पडल्या आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करुन आणि या खर्चाचा टोल जनतेच्या खिशातुन वसुल केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्या अधिकार्यांना हे निकृष्ठ काम दिसत नाही का. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात नविन रस्त्यांचे जाळे विनत अनेक शहरे एकमेकांना जोडली. त्यांच्या कामा बाबत विरोधकांनाही शंका नाही. कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत त्यांनी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करीत आधुनिक भारताचा पाया रोवण्याचा प्रामाणीक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कल्पनेतील निर्माण होनाऱ्या सिंमेट रस्त्यांच्या दर्जा बाबत किमान पन्नास वर्षे हे रस्ते टिकतील असा विश्वास बोलुन दाखविला होता.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

औशा तालुक्यातून जाणाऱ्या या दोन्ही सिमेंट महामार्गाच्या दुर्दशेकडे पाहीले की, संबंधीत गुत्तेदाराने मंत्री श्री गडकरी यांच्या स्वप्नांना छेद दिला आहे. औसा-लामजना-उमरगा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (ब) चे काम अद्यापी पूर्ण झालेले नाही. फक्त रस्ता तयार झाला असुन अनेक पुलाचे काम अजुन बाकी आहे. मात्र झालेल्या रस्त्याला चक्क लांबलचक भेगा पडल्या आहेत. या भेगाच कामाच्या गुणवत्तेची साक्ष देत असल्याचे बोलले जात आहे. 

तर औसा तुळजापुर मधुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ लाही बेलकुंड ते आशीव दरम्यान भेगा पडल्या आहेत. त्या थातुर मातुर बुजविण्यात आल्या असल्या तरी गुत्तेदाराचे आणि या राष्ट्रीय महामार्गावर देखरेख करनाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करणाऱ्या आहेत. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या चाललेल्या कामाच्या दर्जाचे मुल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.