esakal | श्रीगणेशाची मुर्ती घेऊन खुद्द एसपी दारात; अन् पुढे झाले असे की...
sakal

बोलून बातमी शोधा

IMG-20200823-WA0003.jpg

कोरोनावर विजय मिळविणाऱ्या पोलिसांच्या घरी जाऊन त्यांना श्रीगणेशाची मुर्ती देऊन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सन्मान केला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाची स्थापनाही केली.

श्रीगणेशाची मुर्ती घेऊन खुद्द एसपी दारात; अन् पुढे झाले असे की...

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस अधीक्षकांकडूनन चांगल्या कामासाठी पाठीवर कौतुकाची थाप किंवा रिवार्ड दिले जात असले तरी सार्वजनिक किंवा कार्यालयीन कार्यक्रमात. मात्र, शनिवारी परळीच्या पोलिसांना व कुटूंबियांना इतका सुखद धक्का बसला कि जणू हर्षच व्हावा. चक्क पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार कर्मचाऱ्यांच्या घरी गणेशाची मुर्ती घेऊन पोचले.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

गणेश मुर्ती देऊन कर्मचाऱ्यांचा त्यांनी सत्कारही केला आणि त्यांच्या घरातील गणेशाची स्थापनाही खुद्द हर्ष पोद्दार यांनीच केली. त्यामुळे कुटूंबिय देखील सुखावून गेले. चेक नाक्यावरील ड्युटीदरम्यान कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने परळीतील पाच पोलिस कर्मचाऱ्यांना कोरेानाची बाधा झाली. पाचही जणांनी कोरोनावर विजय मिळविला. यातील दोघांचा १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी देखील संपला आहे. 

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

दरम्यान, शनिवारी गणेशाचे आगमन झाले. यंदा कोरेाना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. साधेपणानेच घरात यंदा गणेशाची स्थापना करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मधल्या काळात एका धक्क्यात गेलेले पोलिस कर्मचारी व कुटूंबिय आता सावरुन गणेशाची स्थापना करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी बाजारातून मुर्ती खरेदीचीही तयारी सुरु असतानाच चक्क पोलिस अधीक्षक या कर्मचाऱ्यांच्या दारात श्रीगणेशाची मुर्ती घेऊन हजर झाले.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात 

‘जिल्ह्यातील जनतेला कोरोना विषाणूपासून वाचविण्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले. त्यातून तुम्हाला बाधा झाली मात्र हिंमतीने तुम्ही कोरोनावर विजय मिळविला’ असे म्हणत त्यांनी गणेशाची मुर्ती पोलिस कर्मचाऱ्यांना देऊन सन्मान केला. विशेष म्हणजे पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरातील श्रीगणेशाची स्थापनाही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनीच केली. या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कुठल्याही मोठ्या पारितोषिक, रिवार्डपेक्षा हा मोठा आनंदाचा आणि हर्षोल्हासाचा हा क्षण ठरला. खुद्द एसपी घरी आणि तेच घरच्या सोहळ्यात सहभागी झाल्याने पोलिस कर्मचारी आणि कुटूंबिय देखील भारावून गेले. 

काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर 

पोलिस अधीक्षकांच्या या कृतीने कुटूंब प्रमुख म्हणून अडचणीच्या काळात कायम धीर देण्यासाठी पाठीशी असल्याचा आणि सुख दुःखात सोबत असल्याचा संदेश पोलिस दलात गेला. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या काळात अव्वल काम करणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतींना भेट देऊन एसपी पोद्दार यांनी कुटूंबियांची ख्याली - खुशालीही विचारली. 

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

या काळात पोलिस कर्मचारी सदैव ड्युटीवर असल्याने त्यांचे आणि कुटूंबियांचे मानसिक आरोग्य आबाधीत रहावे यासाठी खास कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. या सेलच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून या कर्मचाऱ्यांना मानसिक आधार दिला जात आहे. आता पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आत्मनिर्भर हा विलगीकरण कक्षही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून उभारला आहे. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस, राहूल दुबाले सोबत होते.

(संपादन-प्रताप अवचार)