esakal | घरफोड्या करणारा जेरबंद; सात मोबाईल फोन जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

घरफोड्या करणारा जेरबंद; सात मोबाईल फोन जप्त 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : घरफोड्या करणाऱ्या संशयितास जेरबंद करून त्याच्याकडून ५४ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले. संशयिताने आष्टी, बीड व नाशिक जिल्ह्यात चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. सय्यद मोहसीन सय्यद जाफर (वय २०, रा. हुसेनिया कॉलनी, तेलगाव नाका, बीड) असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
त्याच्याकडे काळ्या रंगाचा आसूस कंपनीचा एक मोबाईल, निळ्या रंगाचा एमआय पोको कंपनीचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा काळ्या रंगाचा नोट नऊ, लावा कंपनीचा झेड ६० हा सिल्व्हर रंगाचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा सिल्व्हर रंगाचा मोबाईल, एमआय कंपनीचा सिल्व्हर रंगाचा मोबाईल व लावा कंपनीचा काळ्या-पांढऱ्या रंगाचा मोबाईल असे सात मोबाईल त्याच्याकडे आढळून आले. सय्यद मोहसीन सय्यद जाफर याने काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलिस ठाणे (नाशिक) हद्दीत घरफोडी करून, तसेच मुर्शदपूर (ता. आष्टी) येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत मोरे, श्री. उबाळे, श्री. शेख, श्री. खेडकर, श्री. ठोंबरे, श्री. दुबाले, श्री. कदम, श्री. तांदळे, श्री. गायकवाड, राजू वंजारे यांनी सहभाग घेतला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मोंढ्यात पत्रे उचकटून पुन्हा चोरीचा प्रयत्न 
माजलगाव : मागील पंधरा दिवसांपासून शहरातील जुना मोंढा भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला. या चोरांमुळे व्यापाऱ्यांत भीती पसरली आहे. बुधवारी (ता. ३०) रात्री पुन्हा रविराज किराणा या होलसेल दुकानाचे पत्रे उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न चोरांनी केला. परंतु, दुकानात झोपलेल्यांनी दोन संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुना मोंढा बाजारपेठेत अशोक गुजर यांचे रविराज किराणा होलसेलचे दुकान आहे. भुरट्या चोरांचा सुळसुळाट असल्याने व्यापारी दुकानात झोपत आहेत. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुकानावरील पत्रे उचकटून चोर आत घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दुकानात झोपलेले अशोक गुजर यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करून इतरांना सावध केले. परंतु, तोपर्यंत चोरांनी त्याठिकाणाहून पळ काढला. या घटनेनंतर काही काळानंतर दोघे संशयित दुसऱ्या एका दुकानासमोर बसल्याचे आढळून आले. यावेळी काही व्यापाऱ्यांनी मिळून त्या संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या व्यापाऱ्यांमध्ये या भुरट्या चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. 


(संपादन-प्रताप अवचार)