esakal | लस घेतलेले बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Corona Updates

 डॉ.पवार यांनी ता. १८ फेब्रुवारीला बीडच्या जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रात कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस टोचून घेतला. त्यानंतर सोमवारी (ता.एक) त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

लस घेतलेले बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : दहा महिने केवळ चर्चांचे गुऱ्हाळ आणि पोकळ अंदाजानंतर अखेर कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मितीही झाली व लसीकरणही सुरु झाले. पण, लसीकरणानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. डॉ.पवार यांनी ता. १८ फेब्रुवारीला बीडच्या जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रात कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस टोचून घेतला. त्यानंतर सोमवारी (ता.एक) त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

वाचा - थरार! काही कळण्यापूर्वीच भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार, उपचारापूर्वीच सोडला जीव


राज्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय योजना व उपचाराची सुविधा करण्यात प्रशासन दंग होते. याच काळात सोशल मीडियासह विविध माध्यमांवर कोरोना प्रतिबंधक लसीबाबत केवळ चर्चा आणि अंदाज असत. दरम्यान, लसीची अखेर निर्मिती होऊन जिल्ह्यासाठी डिसेंबर महिन्यात सिरम कंपनीच्या कोव्हिशील्ड या लसीचे १७ हजार डोस उपलब्ध झाले. ता. १६ डिसेंबरला लसीकरणास सुरुवात होऊन पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स व दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली.

वाचा - आरोग्य विभागाच्या परीक्षेत तोतयागिरी, पाच जणांना पोलिस कोठडी

आता सोमवार (ता. एक) पासून जेष्ठ नागरिकांनाही लसीकरण सुरु झाले आहे. हेल्थ पहिल्या डोसला महिना उलटलेल्या हेल्थ वर्कर्सच्या दुसऱ्या डोसलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान, बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ता. १२ फेब्रुवारीला कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस टोचून घेतला. परंतु, त्या उपरही त्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनांत त्यांच्या अधिपत्याखालील ग्रामीण आरोग्य यंत्रणेने विविध सर्व्हे, प्राथमिक तपासण्या व आता लसीकरणात उत्तम कामगिरी केली.

वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकाबंदी, कोरोनाच्या धोका वाढू लागल्याने प्रशासन सतर्क

परिणामी जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे उत्तम काम आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूला शिरकाव करण्यास मे महिना उजडावा लागला. भारतीय आयुर्विज्ञान व अनुसंधान परिषद (आयसीएमआर) ने केलेल्या पाहण्यांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्गाचा टक्का राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमीच आढळलेला आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

loading image