शोभा दळवी विद्यार्थ्यांसाठी घेतायत 'कोण बनेगा ब्रिलियंट' उपक्रम

जगदीश बेदरे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

"कौन बनेंगा ब्रिलीयंट" हा उपक्रम माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वांत आवडता आहे. या व अशा अनेक उपक्रमांचा हेतु असा आहे की, मुलांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी, जिज्ञासुवृत्तीवाढीस लागावी, उपस्थितीचे प्रमाण वाढावे, मुले बोलकी व्हावीत, सर्वसमावेशकता वाढावी, आनंददायी शिक्षण, कृतीशीलतेस वाव मिळावा, मूल सृजनशिल बनावे, यासाठी मी माझ्या वर्गात व शाळेत अनेक उपक्रमांचे आयोजन नेहमी करत असते. यातून विद्यार्थ्यांना शाळेविषयीची आवड निर्माण होते.
 - शोभा सुरेश दळवी ( सहशिक्षिका), जि.प. प्रा. शा. कासारवाडी ता. गेवराई

गेवराई : स्पर्धेच्या युगात आता जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकण्याचे प्रयत्न सुरू केलेला आहे. गेवराई तालुक्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना शाळेची आवड कशी निर्माण निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. असाच एक 'कोण बनेगा ब्रिलीयंट' हा प्रयोग तालुक्यातील कासारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षिका शोभा दळवी यांनी करत विद्यार्थीना स्पर्धेच्या युगाची जाणीव व्हावी व शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने शाळे कडे विद्यार्थी यांचे लक्ष वेधले जात आहे. 

गेवराई तालुक्यातील कासारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शाळा सुरु आहे. या ठिकाणी ग्रामीण भाग असल्याने भौतिक सोयी उपलब्ध नाहीत या परिस्थितीत या ठिकाणी गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शाळेतील सहशिक्षका शोभा दळवी या 'माझी शाळा माझे उपक्रम' या ठिकाणी राबवित आहेत. 

त्यांनी डिजीटल धडपड, उतारा लेखन, फिरते वाचनगृह, टाकाऊपासून टिकावू निर्मिती, भोपळा उपक्रम, वृक्षारोपण दिंडी, शाळा यशोगाथा लेखन, प्रश्ननिर्मिती कौशल्य, नाट्यनिर्मिती, चिठ्ठी उचला पटापट असे वेगवेगळे उपक्रम या शाळेत विद्यार्थीयासाठी राबविलेले आहेत. ता. ६ रोजी पासुन त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व स्पर्धेच्या युगाची जाणीव लहान पणीच यावी या उद्देशाने 'कोण बनेगा करोडपती ' फ्रेम ' कोण बनेंगा ब्रिलीयंट' हा उपक्रम शाळेत राबविण्यास सुरूवात केली आहे यासाठी त्यांनी प्रथम मुख्य खुर्ची मंच वर्गात तयार केला, Faster finger चे तीन प्रश्न मुलांना फळ्यावर दिले.ज्यांनी जलद उत्तर दिले त्याला टाळ्यांच्या गजरात मुख्य खुर्चीवर बसवले. त्या मुलाला "कोन बनेंगा करोडपती" शो प्रमाणे "कोन बनेंगा ब्रिलीयंट" या उपक्रमाचेसर्व नियम सांगितले.
त्यांनी यामध्ये १० प्रश्न घेतले, थोडा बदल करुन नियम ठरवले तसेच अडचन आल्यास चार मदत सुविधाही दिल्या यामध्ये जोडीदार, ५०-५०, आॅडियन्स पोल, & Master hint या मदत सुविधा ठरवल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक बरोबर प्रश्नाला स्वखर्चाने वही, पेन असे बक्षिस ठेवले आहे. जो दहा प्रश्नाची अचूक उत्तरे देईल तो शाळेत त्या दिवसाचा ब्रिलीयंट ठरवला जातो. मुख्य खुर्चीवर बसलेल्या मुलांचा सर्वां सोबत सेल्फी काढून निरोप दिला जातो. त्यामुळे खूपच उत्साही व स्पर्धेच्या वातावरणात शाळेत हा उपक्रम पार पडतो आहे त्यामुळे विद्यार्थी यामध्ये जिज्ञासूवृती वाढिस लागते, मनोरंजकता, स्काॅलरशिप प्रश्नांचा समावेश, कृतीशिलतेस वाव मिळतो. सृजनशीलता वाढीस लागते. अशा या उपक्रमामुळे शाळेत विद्यार्थी आनंदाने हजेरी लावत आहेत व शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाणही कमी होत आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

 

Web Title: beed news georai teacher initiative kaun banega brilliant