स्वच्छतागृहाचे अनुदानासाठी माजलगावात टमरेल मोर्चा

कमलेश जाब्रस
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

- विविध संघटना, पक्ष सहभागी
- आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न मार्गी लावा

माजलगाव (बीड): नगर पालिकेने प्रभाग १ ते १२ प्रभागांत बांधलेल्या वैयक्तीक स्वच्छतगृहांचे अनुदान तत्काळ वाटप करावे तसेच आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा, या मागण्यांसाठी पालिकेवर विवीध संघटना व पक्षाच्या वतीने आज (बुधवार) टमरेल मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात राष्ट्रीय भिमसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, काकू-नाना विकास आघाडी, शेतकरी संघटना, बहुजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ, शिवसंग्राम, एमआयएम, लोकजन शक्ती पार्टी, मानवी हक्क अभियान, संघर्ष मजुर कामगार संघटना, यशवंत सेना आदी संघटना व पक्ष सहभागी झाले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: beed news majalgaon rally for toilet fund