esakal | कोरोना झाला पण मदतीचा यज्ञ थांबला नाही, बीडच्या सोहनींचा थक्क करणारा प्रवास !    
sakal

बोलून बातमी शोधा

beed sangh.jpg

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व माँ वैष्णव देवी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष सोहनी यांच्या मोंढा भागातील वैष्णवी पॅलेस या मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये आतापर्यंत साधारण पाचशेंवर रुग्णांवर उपचार झाले असून तीनशेंवर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना झाला पण मदतीचा यज्ञ थांबला नाही, बीडच्या सोहनींचा थक्क करणारा प्रवास !    

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागले आणि ऊसतोड मजूर स्थलांतरीतांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी एक अवलिया रोज मजूरांना उत्तम जेवणाचे डबे पोच करत होता. मजूरांच्या मुलांना नवे कपडेही दिले. मात्र, त्यांनाही कोरोनाची लागण झाली. पण, त्यांचा मदतीचा यज्ञ थांबला नाही. उलट त्यांनी स्वत:च्या मालकीचे भव्य आणि सुविधांयुक्त मंगल कार्यालय प्रशासनाला कोविड केअर सेंटर उभारणीसाठी दिले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व माँ वैष्णव देवी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष सोहनी यांच्या मोंढा भागातील वैष्णवी पॅलेस या मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये आतापर्यंत साधारण पाचशेंवर रुग्णांवर उपचार झाले असून तीनशेंवर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे या रुग्णांच्या उत्तम जेवणही मोफत असून त्यात काही दानशुरांची मदत आहे. ३५ खोल्यांसह मोठे सभागृह असे भव्य मंगल कार्यालय असल्याने रुग्णांनाही इतर स्वच्छतागृह, राहण्याच्या सोयी चांगल्या भेटतात. एकाच वेळी दिडशे रुग्ण रहावेत अशी व्यवस्था इथे करण्यात आली आहे. 

प्रशासनाने यासाठी सहा डॉक्टर, १२ परिचारिका, पाच  वॉर्डबॉय अशी टिम उपचारासाठी उपलब्ध करुन दिली आहे. मागच्या ५२ दिवसांपासून हे सेंटर सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा हातभार आणि रुग्णांना दिलासा भेटला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


संतोष सोहनी यांच्या ५२ दिवसांपासून सुरु असलेल्या या महायज्ञात लोकाशा गोकुळधामचे विजयराज बंब, व्यापारी महासंघाचे विनोद पिंगळे, नितीन खोड, किरण ढेपे, राजेंद्र प्रसाद, सुरेंद्र कासट, सतिश लोढा, राजेश बंब, आशिष जैन, अभिजित पगारिया, धनराज बंब, सुशील खटोड, ललवाणी, वैष्णोदेवी मंदिर संस्थान, जिल्हा व्यापारी महासंघ, भारतीय जैन संघटना, बीएलके कन्स्ट्रक्शन, बीड तहसील माहेश्वरी सभा यांचे पाठबळ आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रशासनाचे उपचार; मोफत उत्तम आहार 
उपचारासाठी प्रशासनाने मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, येथील सकाळी सात वाजता काढा, साडेसात वाजता मधपाणी, नऊ वाजता नाष्टा, एक वाजता जेवण, चार वाजताचहा, रात्री सात वाजता जेवण व नंतर नऊ वाजता हळद दूध दिले जाते. आतापर्यंत चारशेंवर रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ११५ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेले संतोष सोहनी रुग्णांच्या सुविधेसाठी इथेच तळ ठोकून असतात. 

सुरुवातीला मित्रांच्या सहकार्यातून अन्नदान केले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे खाटा कमी पडू नयेत यासाठी मंगल कार्यालयाची जागा कोव्हीड केअर सेंटरसाठी दिली. इथे रुग्ण सेवेच्या संधीमुळे समाधान मिळते.
- संतोष सोहनी, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.
 

(संपादन-प्रताप अवचार)