माजलगावात या तिघांनी केला होता 1 कोटी 61 लाखांचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

चौकशी समितीच्या अहवालानुसार व या 22 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण बीड यांच्याकडून घेतलेली तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता यामध्ये तफावत आहे.

माजलगांव (जि. बीड) : येथील नगर पालिकेत एक कोटी 61 लाख दहा हजार रूपयांचा अपहार व फसवणूकप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित, लेखापाल अशोक कुलकर्णी, अभियंता महेश कुलकर्णी या तिघांवर शहर पोलिसात आज शनिवारी (ता. 14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उघडून तर बघा - पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी? 

येथील नगर पालिकेस शासनाने 11 जानेवारी 2017 ला विशेष रस्ता अनुदान अंतर्गत 1 कोटी 61 लाख दहा हजार 130 रूपयांच्या रस्त्यांच्या व नाल्यांच्या 22 कामांना मान्यता दिली होती. नगर पालिका प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी योजना अंतर्गत झालेल्या अपहार प्रकरणी 3 मे 2019 ला गठित केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार व या 22 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण बीड यांच्याकडून घेतलेली तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता यामध्ये तफावत आहे.

अरे बाप रे - माजलगावात द बर्निंग ट्रक, अचानक घेतला पेट  

मोजमापे यामध्ये तफावत असल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश उपसंचालकांनी दिले होते. त्यानुसार पालिकेतील अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित, लेखापाल अशोक कुलकर्णी, अभियंता महेश कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charge Filed Against Ex CEO of Majalgaon Nagar Parishad And Two Others