जालना जिल्ह्यात पावसाची संततधार ! 

उमेश वाघमारे
Sunday, 11 October 2020

जिल्ह्यात सरासरी सव्वा सहाशे मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा जिल्ह्यात साडेनऊशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

जालना : मागील काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी (ता.) जालना शहरासह जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडामध्ये जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. दरम्यान सकाळपासून शहराचा जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे दुपारपर्यंत सुर्यदर्शन झाले नाही. यंदा जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात सरासरी सव्वा सहाशे मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा जिल्ह्यात साडेनऊशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील मुग, सोयाबीन,  उडीद, मका, कपाशी, ऊस यासह फळबागांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात अडकला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून जालना शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उकाड्यात ही भर पडली आहे. त्यात मागील दोन-तीन दिवसापासून शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी अधून मधून पावसाचे रिपरीप सुरू होते. परंतु रविवारी (ता.11) सकाळपासूनच जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. तर जालना शहरासह काही भागात रिमझिम पाऊस सुरू होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जालना शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच अंबड शहरात ही पाऊस कोसळला. तसेच तालुक्यातील रोहिलागड, अंकुशनगर, वडीगोद्री, शहागड, गोंदी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. परतूर शहरासह तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील वाटूर फाटा, आष्टी आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. घनसावंगी शहरात ही जोरदार पावसाने हजेरी लावली.  तसेच तालुक्यातील जाम समर्थ, कुंभारी पिंपळगाव, तीर्थपुरी आदी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मंठा शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान शहरासह जिल्ह्यात ठिकाणी पावसाची संततधार सुरुवात होती.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continuous rains in Jalna district