अरे बाप रे..! ११४ संगणक केंद्रांना साडे पाच कोटींचा फटका, वाचा कोणत्या जिल्ह्यात घडला हा प्रकार...

हरी तुगावकर
Saturday, 25 July 2020

लातूर जिल्ह्यात असलेल्या ११४ संगणक प्रशिक्षण केंद्रातून उन्हाळाच्या सुट्‌टयात दरवर्षी १४ हजार प्रशिक्षणार्थी संगणकाचे प्रशिक्षण घेवून बाहेर पडतात. पण यावर्षी कोरोनामुळे त्यांची बोटे संगणकाच्या की -बोर्डवर चाललीच नाहीत. साडे पाच कोटीचा फटका या केंद्राना बसला आहे.

लातूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्याला शहरातील शेकडो तरुणांचे उदरनिर्वाहाचे साधन बनलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्रही अपवाद राहिले नाहीत. लातूर जिल्ह्यात असलेल्या ११४ संगणक प्रशिक्षण केंद्रातून उन्हाळाच्या सुट्‌टयात दरवर्षी १४ हजार प्रशिक्षणार्थी संगणकाचे प्रशिक्षण घेवून बाहेर पडतात. पण यावर्षी कोरोनामुळे त्यांची बोटे संगणकाच्या की -बोर्डवर चाललीच नाहीत. साडे पाच कोटीचा फटका या केंद्राना बसला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

तरुणांचे रोजगाराचे साधन
जिल्ह्यात ११४ संगणक प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत. संगणकाचे शिक्षण घेतल्यानंतर तरुणांनी असे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहेत. यात प्रत्येक केंद्रावर तीन ते पाच जणांचा स्टाफ कार्यरत आहे. ही केंद्र पाचशे ते सहाशे तरुणांचे रोजगाराचे साधन आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

कोरोनाचा प्रशिक्षणावर परिणाम
या प्रशिक्षण केंद्राना उन्हाळ्याच्या सुट्टायात मोठा प्रतिसाद मिळत असतो. मुलापासून ते नागरीक संगणकाचे प्रशिक्षण घेतात. यात एमएस-सीआयटी, टॅली, फोटोशॉप, ॲडव्हान्स एक्सेल, सी आणि सी प्लस, प्लस, प्लस, प्रोग्रामिंग असे प्रशिक्षण या केंद्रातून दोन महिन्याच्या कालावधीत दिले जाते. पण यावर्षीची उन्हाळ्याची सुट्टी कोरोना बाधित झाली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

प्रशिक्षण केंद्रात शुकशुकाट
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात या केंद्रातून सुमारे १४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना या केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी कोरोनामुळे या संगणक केंद्रांचे शटर डाऊनच राहिले आहे. ते आजूनही कायमच डाऊनच आहे. या प्रशिक्षणार्थ्यांची बोटे कि बोर्डवर चाललीच नाहीत. सध्या या केंद्रात शुकशुकाटच आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

कोरोनाचा मोठा फटका
या संगणक केंद्रात वर्षभर गर्दी नसते. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मात्र बसायला जागा नसते अशी परिस्थिती असते. एका प्रशिक्षणार्थ्याला चार हजार रुपये शुल्क आकारले जाते. दरवर्षी किमान चौदा हजार जणांना प्रशिक्षण दिले जाते. पण यावर्षी कोरोनामुळे या केंद्रांना साडे पाच कोटीचा फटका बसला आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टयातच प्रशिक्षणासाठी गर्दी असते. संगणक हा भाषा विषय नसल्याने ऑनलाईन शिकवता येत नाही. त्यात प्रॅक्टीकल अधिक आहे. पण यावर्षी कोरोनामुळे केंद्र बंदच आहेत. मोठा फटका आहे. नियमांचे पालन  करुन हे केंद्र सुरु करावीत, अशी मागणी जिल्हाधिकाऱयाकडे करण्यात आली आहे.
महेश पत्रिके, विभागीय समन्वयक, एमकेसीएल, लातूर

(edited by pratap awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Effect 114 computer center loss five and half carod