काय म्हणता..! कोरोनामुक्त रुग्णाचा प्लाझ्मा एवढे वर्ष राहतो स्टोअर..! वाचून तुम्ही व्हाल थक्क..!

हरी तुगावकर
Tuesday, 21 July 2020

गेल्या काही दिवसांपासून प्लाझ्मा दान करण्य़ासाठी कोरोनावर मात करणाऱया व्यक्ती पुढे येत आहेत. या व्यक्तींचा रक्तातील काढून घेण्यात आलेला प्लाझ्मा वजा ऐंशी (-८०) डिग्रीसेल्सिअसला ठेवला. तर तो पाच वर्ष स्टोअर करून ठेवता येतो.

लातूर : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. अद्याप यावर लस आली नसली तरी वेगवेगळ्या थेरपीचा वापर केला जात आहे. यात प्लाझ्मा थेरपी सर्वाधिक लाभदायक ठरत आहे. यातून गंभीर असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना जीवदान देता येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्लाझ्मा दान करण्य़ासाठी कोरोनावर मात करणाऱया व्यक्ती पुढे येत आहेत. या व्यक्तींचा रक्तातील काढून घेण्यात आलेला प्लाझ्मा वजा ऐंशी (-८०) डिग्रीसेल्सिअसला ठेवला. तर तो पाच वर्ष स्टोअर करून ठेवता येतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना या कालावधीत तो कधीही देता येवू शकतो. त्यामुळे प्लाझ्मा डोनेट करणाऱयांची संख्या वाढण्याची गरज आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

रक्तातील द्रव्य भाग म्हणजे प्लाझ्मा 

रक्तातील द्रव्य भाग म्हणजे प्लाझ्मा. प्लाझ्मा दानाची रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. रक्तदानामध्ये रक्तातील पेशीसह काही प्लाझ्मा येत असतो. पण येथे मात्र तसे होत नाही. प्लाझ्मा डोनेट करणाऱयाचे ४०० मिलीलीटर रक्त घेतले जाते. त्यातून मशिनच्या सहाय्याने फक्त प्लाझ्मा काढून घेतला जातो.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

पेशी सोडल्या जातात शरिरात
प्लाझ्मा दान करताना केवळ रक्तातील प्लाझ्मा काढून घेतला जातो. रक्तातील पांढऱया पेशी, तांबड्या पेशी तसेच प्लेटलेट हे सर्व घटक संबंधीत डोनरच्या शरिरात सोडले जातात. त्यामुळे ते नॉर्मल राहतात. दोनही प्रक्रिया एकाच वेळी सुरु असते. त्यामुळे डोनरला कोणताही धोका होत नाही.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

कोण करू शकतो प्लाझ्मा दान
प्लाझ्मा दान करणारा व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्हच असला पाहिजे. त्याचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असले पाहिजे. तसेच तो वय १८ ते ६५ वर्ष या वयोगटातील असला पाहिजे. स्त्री किंवा पुरुष कोणालाही प्लाझ्मा दान करता येतो. कोरोनामुक्त झाल्यानंतर २८ दिवसानंतर ते चार महिन्यापर्यंत प्लाझ्मा दान करता येतो. दान करणाऱया व्यक्तींच्या अंगातील कोरोनाचे सर्व लक्षणे गेल्यानंतरच प्लाझ्मा दान करता येतो.

एक ते पाच वर्ष राहतो प्लाझ्मा
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातील काढलेला हा प्लाझ्मा एक ते पाच वर्ष स्टोअर राहू शकतो. यात वजा चाळीस (-४०) डिग्रीसेल्सिअसला ठेवला तर तो एक वर्ष आणि वजा ऐंशी (-८०) डिग्री सेल्सिअसला ठेवला तर तो पाच वर्ष स्टोअर राहू शकतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना याचा अधिक फायदा होतो. त्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱयांनी पुढे आले पाहिजे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कशाला म्हणतात प्लाझ्मा थेरपी
प्लाझ्मा हा एक पिवळसर रंगाचा द्रव्य घटक आहे. हा आपल्या रक्तातील पेशींना संपू्र्ण शरीरात प्रवाहित करण्याचं काम करतो. तो रक्ताच्या ५५ टक्के असतो. प्लाझ्मा हा रुग्णांना योग्य प्रमाणात दिल्याने शरीरात अँटीबॉडी तयार होतात. ही अँटीबॉडीज फक्त संसर्ग झालेल्या लोकांपासूनच तयार केल्या जाऊ शकतात.
कोविड-१९ पासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, ज्या या विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याला कॉन्व्हुलसंट प्लाझ्मा थेरपी (Convulsant Plasma Therapy) असं म्हणतात. या थेरेपीचा वापर पहिल्यांदा १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू महामारीवेळी करण्यात आला होता.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा कोरोनाच्या गंभीर रुग्णांना जीवदान देवू शकतो. यात रक्तातून केवळ प्लाझ्मा काढून परत पेशी, प्लेटलेट प्लाझ्मा दान करणाऱय़ाच्या शरिरात सोडल्या जात असल्याने त्यांना काहीही धोका नाही. गंभीर कोरोनाचे लक्षण असलेल्या रुग्णाचा प्लाझ्मा इतर रुग्णासाठी अतिउपयुक्त आहे.  एखादा व्यक्तीला विविध आजार आहेत. पण त्याने कोरोनावर मात केली आहे. अशा व्यक्तीचा देखील प्लाझ्मा घेता येतो. प्लाझ्मा एक ते पाच वर्षापर्यंत स्टोअर करून ठेवता येतात. गरज पडेल त्या वेळेस ते वापरले जावू शकतात. प्लाझ्मा दान करणाऱयांनी पुढे आले पाहिजे.

डॉ. मारुती कराळे, प्रमुख, कोरोना विलगीकरण कक्ष, 
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर

(संपादन प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona free patient plasma stays in store for five years