अरे वा..! कोरोनामुळे या वृक्षाला मिळाले जीवदान..! वाचा नक्की कसे घडले..

bel.jpg
bel.jpg
Updated on

लातूर : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊऩ सुरु आहे. जागच्या जागी जगच थांबले गेल्याने त्याचा प्रदूषणावर मोठा परिणाम झाला. ओझोनचा लेअरही वाढला गेला.

तर दुसरीकडे वृक्षवल्ली बहरून आली. सर्वत्र हिरवळ दिसू लागली आहे. यातच श्रावण महिन्यात बेलांच्या पानांना अनन्य साधारण महत्व आहे. यामुळे भक्तीपोटी हजारो बेलांच्या वृक्षांची पान ओरबडली जातात. त्याचा व्यवसाय केला जातो. पण वर्षी मात्र कोरोनामुळे भक्ती कायम राहिली पण त्यासोबतच हजारो बेल वृक्षाला जीवदान मिळाले आहे.

या वृक्षाला देशाच्या विविध भागामध्ये आणि देशाबाहेरही वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मराठीत (बेल); हिंदी (बेल, सिरल); संस्कृत (बिल्वा, श्रीफळ, शिवद्रम, शिवपाल); तेलगू (मारे डू); बंगाली (बिल्बम); गुजराती (बिल); कन्नड (बिप्तारा, कुंबळा, मालुरा); तामिळ (कुवलम); थाई (मातम आणि मॅपिन); कंबोडिया (फ्नू किंवा पीनोई); व्हिएतनामी (बाऊनऊ); मलायन (माझ पास); फ्रेंच (ओरंगेर ड्यू मालाबार); पोर्तुगीज (मार्मेलोस) अशा वेगवेगळ्या नावांनी बेल वृक्षाला संबोधले जाते.

प्राण वायूचा स्त्रोत असलेले वृक्ष

बेलाच्या वृक्षाला वेगळे महत्व आहे. बेलाचा वृक्ष वातावरणामध्ये हवामानातील शुद्धीकरणाचे कार्य करते. प्राणवायूचा एक स्त्रोत म्हणून बेल वृक्षाकडे पाहिले जाते. वातावरणामधील विषारी वायू शोषून घेण्याचे कामही हे वृक्ष करते. त्यामुळे प्रत्येकाने या दृष्टीने बेलाच्या वृक्षाकडे पाहण्याची गरज आहे.

देवाच्या भक्तीसाठीचा वृक्ष

मे ते ऑगस्ट या कालावधीत बेल भरपूर प्रमाणात बहरात आलेला असतो. याच कालावधीत श्रावण महिनाही येतो. श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी शंकर, महादेव या देवांची आवर्जून पूजा केली जाते. या पूजेसाठी बेलाचे पान अन फळांचा अधिक वापर केला जातो. म्हणून बेल हे देवी-देवतांचे फळ मानले जाते. भक्तीसाठी त्याचा वापर केला जातो.

श्रावणात ओरबडली जातात झाडे

श्रावणात घरोघरी महादेवाची पूजा केली जाते. भाविकांची ही भक्ती लक्षात घेवून अनेकाचा बेल विकणे हा व्यवसाय झाला आहे. शेतातील बेलाची झाडांचे पाने, फळे ओरबडून आणून शहरी भागात विकली जातात. दरवर्षी गल्लोगल्ली असे विक्रेते पहायला मिळतात.

कोरोनाने वाचवला बेल

या वर्षी मार्चपासूनच कोरोनाचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. मंदिरे बंद आहेत. लोकांना घरा बाहेर पडता येत नाही. त्यामुळे व्यवसाय करणारेही घरातच बसून आहेत. त्यामुळे यावर्षी हजारो बेलांच्या झाडाला जीवदान मिळाले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली बाब मानली जात आहे.


कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बेलांची झाडे वाचली गेली ही अत्यंत चांगली बाब आहे. देवांचे फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते. पण बेलाला आयुर्वेदात खूप मोठे महत्व आहे. बेलफळ नियमित खाल्ल्याने आरोग्याच्या द‍ृष्टीने अनेक फायदे होतात. मेंदू विकार, ह्रदयरोग, मूळव्याधी, वात, कफ, उष्णता, आतड्यांच्या व्याधी, बद्धकोष्टता, स्मरणशक्ती वाढवणे, पचनशक्ती, दृष्टीदोष अशा अनेक व्याधीवर बेल गुणकारी आहे. पौष्टिक मूल्यामध्ये बेल फळ उच्च आहे. त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, तंतुमय पदार्थ यांचा चांगला स्त्रोत आहे. बेल फळात जीवनसत्व ब २ सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. बेल फळ सर्वात पौष्टिक फळापैकी एक आहे. त्याचे महत्व सर्वांनी ओळखून ते नष्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
डॉ. पवन लड्डा, (लड्डा आयुर्वेदीक चिकित्सालय आणि समन्वयक लातूर वृक्ष)

(संपादन-प्रताप अवचार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com