CORONAVIRUS : जालन्यात कोरोना मीटर सुरुच, आज २८ कोरोना बाधितांची भर

corona image.jpg
corona image.jpg

जालना : जालना जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येण्यास तयार नाही. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरूवारी (ता. तीन) सकाळी जिल्ह्यात २८ कोरोनाचा बाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण तब्बल ६४८ जण कोरोना बाधित झाले आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
जालना जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६४८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. गुरूवारी (ता. तीन) सकाळी १२५ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९७ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. 

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात ३६८ जणांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. तर १९ जणांचा कोरोनाने बळी गेला असून आजघडीला २६१ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नागरिकांची गर्दी सुरूच

एप्रिल महिन्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर शहरातील रस्ते ओस पडले होते. मात्र, आता कोरोनाच्या रूग्णांची संख्या ६४८ झाली असतांना देखील शहरातील नागरिकांची सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होण्यास तयार नाही. परिणामी कोरोनाचा विळखा अटोक्यात येण्यास तयार नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी जिल्हा प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी कडक उपाय-योजना करणे अपेक्षित आहे. अन्यथा कोरोनाच्या बाबतीत जालन्याचा औरंगाबाद होण्यास वेळ लागणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com